15 सेकंदात कारची काच तोडली, आणि गाडीतून ” एवढा ” लाखाची केली चोरी, व्हिडिओ होतोय व्हायरल.

अनेकदा आपण कामानिमित्त बाहेर फिरायला जात असतो. बाहेर फिरायला गेल्यानंतर आपण आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभा करतो. आणि ज्या अतिशय महत्त्वाच्या वस्तू असतात त्या आपण आपल्या चार चाकी मध्ये सुरक्षित ठेवतो. व त्यानंतर गाडी लॉक करतो कारण गाडी लॉक असताना त्याला कोणीही हात लावणार नाही. असा अनेकांचा समज झालेला असतो मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण याचाच प्रत्यय देणारी एक घटना लासलगाव या ठिकाणाहून समोर आली आहे. सदरील घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि तुमचा समज किती चुकीचा आहे हे तुमच्या लक्षात येईल.
सदरील व्हिडिओमध्ये दिवसाढवळा एका चोराने कारमधून रक्कम लंपास केलेली घटना समोर आली आहे. आणि दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना लासलगावच्या कोटमगाव या ठिकाणी घडली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की, रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या कारची काच तोडून एका चोरट्याने जवळपास साडेतीन लाख रुपये लंपास केले आहेत. लासलगावच्या कोटमगाव येथे भर दिवसा ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, एका व्यापाऱ्याने बँकेमधून साडेतीन लाख रुपये काढले होते, आणि ते पिशवीमध्ये ठेवून ही पिशवी त्याने कारमध्येच ठेवली होती. त्यानंतर आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करून हा व्यापारी मार्केटमध्ये गेला. आणि त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून असलेला हा चोरटा याने संधी साधत त्याचं सोनं केलं. त्या व्हिडिओमध्ये चोरट्याने कशा पद्धतीने कारची काच तोडून ठेवलेली पिशवी घेतली आणि त्या ठिकाणाहून कसा पसार झाला हे आपल्याला दिसत आहे.
या चोरीची संपूर्ण घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. यामध्ये हा चोर आजूबाजूला लोकांना संशय येऊ नये म्हणून त्या गाडीच्या एकदम जवळ उभा राहतो आणि अवघ्या पंधरा सेकंदाच्या आत तो कारची काच तोडतो आणि आत मध्ये पिशवीमध्ये ठेवलेले पैसे घेतो आणि त्या ठिकाणाहून लंपास होतो. त्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
पण या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर चोर कशा पद्धतीने कारची काच तोडून चोरी करू शकतो हे आपल्या सगळ्यांच्या समोर आले आहे. जर आपणही असे काही करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्त्वाचा आहे. कारण जशी चूक या व्यापाऱ्यांकडून घडली आहे अशी चूक आपणा कुणाकडून घडू नये यासाठी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.