12 तासांच्या चकमकीत 36 माओवाद्यांना कंठस्नान, गडचिरोली पोलीस तिघांना शौर्यचक्र.
संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय. तीन दिवस हा महोत्सव सुरू आहे. हर घर तिरंगा समान यंदाच्या महोत्सवामध्ये प्रत्येक भारतीय माणूस हा सहभागी होतोय. स्वातंत्र्याचा दिवस म्हणजेच एखादा सण उत्सवच जणू काही आणि या दिवशी देशसेवेसाठी जे अधिकारी आपल्या कर्तव्य बजावतात, अशा अधिकाऱ्यांचा सन्मान केला जातो यात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सैन्य दलासाठी असलेला शौर्य चक्र हे पहिल्यांदा जाहीर झाल.
स्वातंत्र्य दिनाचे अवचित्त साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करतो. यावर्षी १०८२ पोलीस पदक जाहीर झाले, असून 87 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. तर 347 पोलिसांना शौर्यपदक जाहीर करण्यात आल 648 पोलिसांना प्रशासनीय सेवेसाठी पोलीस पथक जाहीर करण्यात आलं.
यामध्ये महाराष्ट्राला एकूण 84 पदक मिळाली आहेत. माओवादीच्या बालेकिल्लात अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात सी सिक्स्टीच्या या जवानांनी घुसून तब्बल 12 तासाच्या चकमकीत 36 जहाल माओवादीना कंठस्नान घातलं. रवींद्र नेताम टिकराम काटोगे हे दोन जवान यात जखमी झाले तर सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात जवानांनी यश मिळवल. या जहाल माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे हा ठार झाला.
गेल्या वर्षी मराठी मार्टिनटोलाच्या चकमकीत तब्बल 36 विशेष म्हणजे सैनिक दलातील असलेले शौर्य चक्र पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलासाठी जाहीर झाल्.