Live मध्येच ” या ” मुळे एक महिला पत्रकार चक्क मुलाच्या थोबाडीत मारते.
पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल जाते. पत्रकारिता करताना अनेक वेगवेगळे प्रकार असतात, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता देखील केली जाते. इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत असताना टीव्ही रिपोर्ट करणं, फिल्डवरती जाऊन बातमी करणं हे आव्हानात्मक असतं. एखाद्या न्यूज रिपोर्टर ला फिल्डवरती काम करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. आपण ज्या घटनास्थळी आहोत ती नेमकी घटना काय आहे त्याचं स्वरूप काय आहे पार्श्वभूमी काय असेल याची पूर्ण कल्पना घेऊन त्या ठिकाणी पोहोचावे लागतात.
कधी कधी अचानक एखादी घटना घडते, तेव्हा त्या ठिकाणी रिपोर्टिंग करणं हे जोखमीचे होत. बऱ्याचदा महत्त्वाच्या ठिकाणी रिपोर्टिंग ही लाईव्ह न्युज रिपोर्टर सोबत असतं. तर दुसरी ही स्टुडिओ मध्ये सुरु असते घटनास्थळी काय सुरु आहे याची अचूक माहिती स्टुडिओमध्ये बसणाऱ्या न्यूज अन्करला द्यावी लागते. त्यावेळीफिल्ड वरती जे काही आव्हाने असतील ते सर्व पैलून आपली बातमी सर्वात आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जी धडपड असते ती प्रत्येक टीव्ही अँकर चे असते. मात्र लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना येणाऱ्या अडचणी आहेत यावर ती मात करतं आपलं काम चोख पणे बजावते.
याबद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये महिला रिपोर्टर या व्हिडिओमध्ये असं काहीतरी करताना दिसतीया नेमकं ही असं का करतीये नेमकं काय घडलं हे पाहुयात. ती संतापलेली टीव्ही रिपोर्टर एका मुलाच्या थोबाडीत मारते. पत्रकार महिला कॅमेरात पाहून घटनेची माहिती देत असते, तिच्या समोर लाईव्ह कॅमेरा सुरू आहे आणि ती अपडेट देत असते पण त्यांच्या समोर काही मुले आहेत त्यानंतर महिलांमध्ये आपला रिपोर्टिंग थांबवते. आणि ती एका मुलाच्या कानशिलात लगावते. रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकार आऊट ऑफ कंट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं. समोर रिपोर्टिंग करत होती त्याच रागात तिने हे केलं. तिने कॅमेरा समोर असे का केले ? एवढा राग का आला याबाबतीत हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. लाईव्ह कॅमेरा सुरू असताना ती असं का करू शकते असेही सर्वांना वाटलं.
महिला रिपोर्टिंग करत असताना मुलगा कॅमेराच्या समोर येतो, त्याला मागे ढकलले जातात तरी पुढे सरकतो आणि याचा त्या महिला पत्रकाराला राग येतो. ती त्याला कानशिलात मारते. हा अकाउंट वरती हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ही घटना 10 जुलैला म्हणजेच बकरी ईदच्या दिवशी असल्याचे सांगितले जाते. अनेकांनी या महिलेला पाकिस्तान चांद नवाब असेही म्हटले. गर्दीत आपलं बोलणं पूर्ण न करू शकणाऱ्या पाकिस्तानी पत्रकार चा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. काहींनी या महिला पत्रकाराच्या या कृतीचा समर्थन केले. तर काहींनी विरोध केला यावर काही मजेशीर प्रतिक्रिया देखील आल्यात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर ती वारंवार व्हायरल होत असतात, मात्र आपण जे काम करतो त्या आड येणाऱ्या लोकांना समजावून सांगणं फार महत्त्वाचे असते. आपलं काम सक्षम होऊ नये म्हणून उगीच एखाद्याला मारहाण करणं याचं समर्थन होऊ शकत नाही.