महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच सरकार, संध्याकाळी होणार शपथविधी !!
सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री त्यांचे नाव आहे एकनाथ शिंदे
दहा दिवसाच्या नाट्याला आज फुल स्टॉप मिळाला बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटी – गोवा – गुजरातचा दौरा करणारे एकनाथ शिंदे अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. सायंकाळी सात वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.
शिवसेनेतच आमदारांना बंडखोरी करत बाहेर काढणाऱ्या आणि त्यानंतर या महा विकास आघाडी सरकारला कोसळण्यासाठी मोठं कारण ठरणारे एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा हा सर्वात मोठा निर्णय आहेत. एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांनी ऑफर केलं होतं. भाजपाला मात्र आज पत्रकार परिषद घेत नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे आले नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर यामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहातील. असे सांगितले मात्र उपमुख्यमंत्री यांचे नाव पुढे येऊ शकले नाहीये.सायंकाळी ठीक सात वाजता शपथविधी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची राजभवनात संयुक्त पत्रकार परिषद सुरू आहे. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव केले आहे.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-
- बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार येणार.
- संध्याकाळी ७ वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
- भाजप एकनाथ शिंदेंना समर्थन देणार.
- देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार.
- बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जाणार.