मुक्ताईनगर येथे महिलेने त्या कार्यकर्त्याला धू-धू धुतला; पाहा काय आहे कारण..
सोशल मीडिया वरती अनेक वेगवेगळ्या पोस्ट काही मंडळी टाकत असतात, कधी ट्रॉलिंग असेल ,कधी बदनामीच्या पोस्ट असतील ,कधी आपले प्रकटपणे मत मांडणारी पोस्ट असेल, कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडछाड देखील केली जाते. मात्र जर तुम्ही ही पोस्ट टाकत असाल तर जरा जपून. तुमच्या पोस्ट मधून कुणाची बदनामी झाली तर याठिकाणी तुमचाही नंबर लागू शकतो.
माझी सोशल मीडियावर ती माझी बदनामी का करतो ? असं म्हणत एका कार्यकर्त्याला महिलेने पहा कसा चोप दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी एका क्षणात लाखो लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत असते. जर आपल्या बद्दल क्षणार्धात लाखो मंडळी पर्यंत चुकीची माहिती गेली तर त्या ठिकाणी संताप येण सहाजिक आहे. आणि याच संतापलेल्या महिलेने या तरुणाला बेदम मारले. लोकांनी तर चक्क याचा व्हिडिओ देखील बनवला.
भर चौकात चोप दिलेले व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील, मात्र हा व्हिडिओ आहे जळगाव मधील मुक्ताईनगर या ठिकाणीचा. अनेक लोकांच्या गर्दीत एका महिलेनं एका कार्यकर्त्याला बेदम मारत होती. यामागे कारण काय आहे ? महिला भर चौकात या कार्यकर्त्याला मारत राहिली कधी तोंडावर, कधी अंगावर, कधी पायातली चप्पल घेऊन ती त्या तरुणाला मारतच राहिली. लोक त्याचा व्हिडियो शूट करत राहिले, याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
मुक्ताईनगर मध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार होती, पण न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक स्थगित झाली. त्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला .संबंधित प्रकार हा मुक्ताईनगर मधून समोर येत आहे. मारणाऱ्या त्या महिलेने आपली भूमिका मांडली त्या महिलेच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट केली होती. या आरोपाखाली त्या महिलेनं त्या तरुणाला चांगलं चोपल, आम्ही तुम्हाला निवडून देतो तुम्ही असं करता का ? त्यामुळे त्या नालायकाला मारीन. तो कुठलाही समर्थक असला काय, त्याची आई नगरसेविका असली म्हणून काय झाल ? तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही असे धंदे करणार का ? सामान्य माणसाला तुम्ही त्रास का देता ? असा सवाल विचारत त्या महिलेने त्या मुलाला जबर मारलं.
व्हिडिओमध्ये महिला त्या व्यक्तीला मारताना स्पष्टपणे दिसत आहे. आजूबाजूचे लोकही कुठलीही मदत करत नाही किंवा कुणीही मध्ये पडत नाही. चूक आहे म्हणून दुर्गा अवतार घेऊन ती महिला मारत आहे तिच्या सोबत असणारी ती तरुणी सुद्धा त्या व्यक्तीला बेदम मारत आहे. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. काही जणांनी हे सर्व मोबाईलमध्ये चित्रीत केला. चुकीची काम केल्यानंतर भरचौकात अशाच पद्धतीनं चोप दिला तर डोकं ठिकाणावर येईल अश्या चर्चा लोकांमध्ये रंगू लागल्या. अस काही घडू नये यासाठी सोशल मिडीयाचा, इंटरनेटचा योग्य उपयोग करणं अत्यंत महत्त्वाचं !