पुण्यात सासूने विधवा सुनेचे केले कन्यादान; पहा बातमी सविस्तर.
सासू सूनेच नात हे नेहमी वादाच्या भोवर्यात असत अनेकदा सासू सुना एकमेकीच आनदून करत असतात , बर्याच ठिकाणी एकमेकीच पटत हि नसत मात्र काही सासू सुनांच नात हे आदर्शवत असत, दोघीच नात हे विश्वास न बसण्या पलीकडचे आहे, कारण एका सासूने आपल्या सूनेच दुसर लग्न लावून दिल आहे, समाजामध्ये सासू सुनेच्या नात्याबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. काही घरात सुनेला मान मिळतो तर काही घरात सुनेला सासुरवास असल्याच्या घटना आपण आपल्या आजूबाजूला दररोज पाहतो.
पण पुण्यातूनच सासूने आपल्या सुनेच्या नात्याचा एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. छाया लायगुडे असे त्यांचं नाव आहे. सासूचा पुढाकार आणि त्यांच्या या विचारांना त्यांचा छोटा मुलगा आणि सुनेने दिलेला प्रतिसाद यामुळे त्यांनी सुनेचा पुनर्विवाह लावून दिला आहे.
पाच ते सहा वर्षांपूर्वी छाया लायगुडे यांचा मोठा मुलगा विशाल लायगुडे याचे दीर्घ आजाराने अवघ्या ३२ व्या वर्षी निधन झाले. विशालच्या पश्चात त्यांची आई, पत्नी रश्मी, आणि पाच वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे एवढ्या लहान वयात सुनेच्या वाट्याला मोठ दुःख आले. मुलगा गेल्याने सूनेवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे सुनेच्या भविष्याचा विचार सासूच्या मनात घर करून होता. त्यामुळं त्यांन रश्मी यांचा दुसरा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला.
समाजात जर असे नाते असतील समाज सुधारण्यास मोठी मदत होईल अशी उदाहरण खर्च प्रेरणादायी असतात सासू सुना हे प्रेम अनेकांना भावत आहेत हि सासू आपल्या सुनेची आई झाली आहे, सासूबाईच सूनेच कन्यादान केल,