माहिती तंत्रज्ञान

इन्फिनिक्सने ६.६ इंच एचडी स्क्रीनसह स्मार्ट ६ एचडी लॉन्च केला.

~ उत्तम व्ह्यू व विशाल बॅटरीसह ६७९९ रूपये या स्पेशल लॉन्च किंमतीमध्ये उपलब्ध ~

मुंबई, १६ ऑगस्ट २०२२: ट्रांसियॉन ग्रुपचा प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्ड इन्फिनिक्सने त्यांच्या मूल्य-संचालित स्मार्ट सिरीजमधील उदयोन्मुख नवीन स्मार्टफोन स्मार्ट ६ एचडी लॉन्च केला आहे. हा डिवाईस युजर्सना सर्वसमावेशक स्मार्टफोन अनुभव देण्यासाठी बिग स्क्रिन व बिग बॅटरी, तसेच बिग स्टोरेज अशा आवश्यक गोष्टींबाबत तडजोड करत नाही. फक्त फ्लिपकार्टवर ६७९९ रूपये या स्पेशल लॉन्च किंमतीमध्ये उपलब्ध असणा-या स्मार्ट ६ एचडीमध्ये फेस अनलॉक वैशिष्ट्य आणि इतर विविध कॅटेगरी-फर्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. या डिवाईस अॅक्वा स्काय, ओरिजिन ब्ल्यू व फोर्स ब्लॅक या तीन आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येतो.

सर्वात मोठी स्क्रिन व डिस्प्ले: सर्वात मोठे व प्रखर मोबाइल व्युईंग अनुभवाच्या खात्रीसाठी नवीन स्मार्ट ६ एचडी मध्ये ६.६ इंच ड्रॉप नॉच स्क्रिनसह ५०० नीट्सचे ब्राइटनेस आहे. ९०.६ टक्के स्क्रिन-टू-बॉडी रेशिओ असलेल्या या डिवाईसच्या सिनेमॅटिक स्क्रिनमध्ये १५००:१ कॉन्ट्रास्ट रेशिओ आणि ९९ टक्के सुपर आरजीबी कलर गम्यूट आहे, ज्यामुळे फोटोज व व्हिडिओज सूर्यप्रकाशात देखील सुस्पष्ट व आकर्षक दिसतात. आकर्षक व्युईंग अनुभवाला डीटीएस सराऊंड साऊंड स्पीकरच्या शक्तिशाली साऊंड अनुभवाची जोड आहे, ज्यामधून इंद्रियांना आनंददायी संगीत ऐकण्याचा आनंद मिळतो.

विशाल क्षमतेची बॅटरी: स्मार्ट ६ एचडीमध्ये ५००० एमएएच बॅटरी पॉवरहाऊस आहे, ज्याला पॉवर मॅरेथॉन वैशिष्ट्याचे पाठबळ आहे, जे जवळपास १०२ तासांचे संगीत ऐकण्याचा, १३५ तासांचे कॉलिंग आणि २६ तासांचे मनसोक्तपणे व्हिडिओज पाहण्याचा आनंद देते. हे तंत्रज्ञान तीन पॉवर-सेव्हिंग धोरणे देतात: ‘पॉवर बूस्‍ट’, ‘अल्ट्रा पॉवर मोड’ आणि ‘व्हिडिओ पॉवर इंजिन’. बॅटरी तिच्या एकूण क्षमतेच्या ५ टक्क्यांपर्यंत असताना युजर्स पॉवर मॅरेथॉन टेकच्या माध्यमातून अल्ट्रा पॉवर मोड चालू करू शकतात आणि अतिरिक्त १५ तासांपर्यंत बॅटरी कार्यरत ठेवू शकतात, ज्यामधून जवळपास ९० मिनिटांचा कॉलिंग टाइम मिळू शकतो.

आकर्षक लुक्स: निसर्गाच्या सर्वोत्तम बाबींमधून प्रेरित स्मार्ट ६ एचडीमध्ये चमकदार ऑरो वेव्ह्ज डिझाइन आहे, जी प्रत्येक क्षणी चमकते. उल्लेखनीय, पण स्टायलिश असलेल्या या डिवाईसमध्ये चार उत्साही फिनिशेस आहेत, ज्यामुळे तुम्ही गर्दीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घ्याल.

व्यापक स्टोरेज क्षमता: नवीन स्मार्ट ६ एचडीमध्ये ३२ जीबी स्टोरेज आहे, ज्याला इन-बिल्ट २ जीबी एलपीडीडीआर४एक्स जीबी रॅम आणि वाढवता येऊ शकणा-या अतिरिक्त २ जीबी व्हर्च्युअल रॅमचे पाठबळ आहे. व्हर्च्युअल रॅम वैशिष्ट्य कार्यान्वित करत टेम्पररी फाइल्स डिवाईसमधील इंटर्नल स्टोरेजमध्ये पाठवता येतो आणि स्मार्टफोन सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्स पार्श्वभूमीमध्ये कार्यरत ठेवू शकतो. युजर्सना ते अॅप्स लॉन्च होण्याची अधिक वाट पाहावी लागणार नाही आणि अॅप्सदरम्यान जलदपणे मल्टीटास्क करू शकतात.

सुधारित सुरक्षितता: स्मार्ट ६ एचडी समजण्यास व वापरण्यास सुलभ असलेल्या वैशिष्ट्यांसह अधिक गोपनीयतेची खात्री देतो. या डिवाईसमध्ये फोन व स्टोअर केलेल्या डेटाच्या सुधारित सुरक्षिततेसाठी फेस अनलॉक देखील आहे.

कॅमेरा कार्यक्षमता: स्मार्ट ६ एचडी ८ मेगापिक्सल एआय रिअर कॅमेरा व ड्युअल एलईडी फ्लॅशलाइटच्या माध्यमातून संस्मरणीय क्षणांना कॅप्चर करतो, ज्यामधून सर्वोत्तम व अधिक अचूक सुस्पष्टता व सर्वोत्तम बोकेह इफेक्टची खात्री मिळते. या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह ड्युअल एलईडी फ्लॅश देखील आहे. सेल्फी कॅमेरामध्ये देखील आवश्यक मोड्स आहेत, जसे टाइम-लॅप्से, पोर्ट्रेट मोड, वाइड सेल्फी मोड आणि फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची क्षमता आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!