प्रेरणादायी: १४ व्या वर्षी लग्न तर १८ वर्षांपर्यंत २ मुलांची आई; IPS अंबिका यांची कहाणी.
हवालदाराची बायको IPS अधिकारी त्या दोघांच्या प्रेमाची प्रेरणादायी कहाणी ;
लग्नानंतर अनेक स्त्रियाचे आयुष्य बदलत अस म्हंटल जात ,मात्र हे खरच आहे ,अंबिकाच आयुष्य बदल ,पतीच्या साथीने तिने यश मिळवलं ,एन. अंबिका या एकदा त्यांच्या हवालदार पतीसोबत प्रजासत्ताक दिनाची पोलिस परेड पाहण्यासाठी गेली होत्या. तिथे त्यांनी पतीला पोलिस अधिकाऱ्यांना सलामी देताना पाहिले. मला हा सन्मान कसा मिळू शकतो असा प्रश्न त्यांना पडला. याबाबत अंबिका आपल्या पतीशी बोलल्या. हा सन्मान मिळवणे इतके सोपे नाही आणि त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात असे पतीने यावेळी सांगितले.
यूपीएससीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अंबिकाने नागरी सेवांची प्रवेश परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.तामिळनाडूच्या रहिवासी एन. अंबिका यांचा विवाह १४ व्या वर्षी दिंडीकलमधील पोलीस हवालदाराशी झाला होता आणि वयाच्या १८ व्या वर्षी त्या दोन मुलांची आई बनल्या होत्या. अंबिका आपल्या घरच्या आणि मुलांची काळजी घेण्यात व्यस्त होत्या. तोपर्यंत त्यांच्या मनात यूपीएससी आणि आयपीएस होण्याचा विचार येत नव्हता. चेन्नईत राहत असताना एन. अंबिका यांनी खूप मेहनत केली आणि यूपीएससी परीक्षेची खूप तयारी केली. मात्र, असे असतानाही त्या सलग तीन वेळा अपयशी ठरला. तिसर्यांदा अंबिका पास झाल्या नाहीत तेव्हा त्यांच्या पतीने परत येण्यास सांगितले पण आपण शेवटचा प्रयत्न करुन पाहू असे त्यांनी ठरवले आणि तसा आग्रह धरला. त्यांच्या पतीनेही याला होकार दिला
एन. अंबिका आणि त्यांचे कुटुंब एका छोट्या गावात राहत होते. येथे शिक्षणाची पुरेशी सोय नव्हती. त्यानंतर अंबिकाच्या पतीने आपल्या पत्नीची चेन्नईमध्ये राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी पत्नीच्या अभ्यासाला पूर्ण पाठिंबा दिला आणि नोकरीबरोबरच मुलांचा सांभाळ स्वतः करू लागला.एन. अंबिका यांनी चौथ्या प्रयत्नात आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि २००८ मध्ये यूपीएससीची कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली.
आपल्या पतीने दिलेली साथ हि बाब श्रेष्ठ आहे , अस बोलताना त्या सांगतात. कारण एका स्त्रीला संसार करताना रोज अनेक आव्हानं असतात त्याचा समान करत , यश मिळवाव लागत .