प्रेरणादायी : एकाच घरातील दोघी बहिणीने मिळवले असे यश !!
सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की मुली या मुलांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये मुलांच्या पुढे आहेत. कुठल्याही क्षेत्र बघितले तरी मुलीने नंबर मारलेला आपण सगळे पाहतो. यामध्ये बरेच विद्यार्थी हे दहावी, त्यानंतर बारावी, बारावी नंतर पदवीधर शिक्षण घेतात व पदवीधर होत असताना ज्यांना एमपीएससी, यूपीएससी ची आवड असते ते या सगळ्याचा अभ्यास देखील करत असतात. यूपीएससी व एमपीएससी यांचा अभ्यास करून क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री अशा पोस्ट घेण्यासाठी मुले मुली प्रयत्न करत असतात. कुणी आयएएस व्हायचं स्वप्न पाहत कुणी आयपीएस आणि त्याच प्रमाणे त्यासाठी लागणारा अभ्यास हे मुले – मुली करत असतात. आणि हा अभ्यास करून ते यश देखील संपादन करतात एकाच घरातील दोन बहिणी सोबत.
एकाच घरातील दोन्ही बहिणी या एकत्र अभ्यास करून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. मोठ्या बहिणीने तिसरा तर धाकट्या बहिणीने 21वा क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही बहिणींची नावे अंकिता जैन व वैशाली जैन ही आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा देण्यासाठी दरवर्षी शेकडो मुले मुली नागरी सेवांमध्ये आपापले प्रयत्न करत असतात. व त्यामध्ये यश संपादन करत असतात. प्रत्येकाच्या यशाची व संघर्षाची कहाणी वेगवेगळी असते. आजच्या बातमीमध्ये एक प्रेरणादायी व उत्साहवर्धक कथा म्हणजे या दोन्हीही बहीण आय ए एस झाल्या आहेत. यामध्ये अंकिता जैन परीक्षेमध्ये तिसरा क्रमांक तर तिची धाकटी बहीण वैशाली हिने 21वा क्रमांक मिळवला आहे. या दोघींनी स्वप्न सारखेच बघितले त्यासाठी यांच्या नोट्स देखील सारख्याच होत्या आणि जेव्हा यांची स्वप्नपूर्ती झाली तेव्हा यांनी त्याचा विजय देखील एकत्रच मानला.
या दोघींबाबत सांगायचं झालं तर, एकाच घरातल्या दोन्ही सख्या बहिणी आयएएस अधिकारी झाल्या. यामध्ये आश्चर्याची गोष्ट सांगायची झाली तर यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करताना या दोघींनी एकाच नोट्सने अभ्यास केला. व एकमेकींना प्रेरणा देत त्यांनी एकमेकींचा आत्मविश्वास देखील वाढवला. नक्कीच या दोघींच्या क्रमांकामध्ये थोडाफार फरक असेल, पण दोघींची मेहनत ही सारखीच होती. यामध्ये अंकिता जैन म्हणते तिने चौथ्या प्रयत्नात यूपीएससी सिविल सर्विसेस परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवला. ते ही धाकटी बहीण वैशाली तिने काढलेल्या नोट्स वाचून. या दोघींचे वडील हे व्यापारी आहेत व त्यांची आई ही गृहिणी आहे. या दोघींच्याही यशामध्ये आई-वडिलांचा खारीचा वाटा आहे. अंकिताने बारावी पूर्ण करून बी टेक केले आहे. आणि बी टेक पूर्ण केल्यानंतर एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. तिने नोकरी करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली व त्यामध्ये तिने मन लावून अभ्यास केला.
अंकिता सांगते कि, तिने तीन वेळा प्रयत्न केले होते पण पहिल्यांदा आणि तिसऱ्यांदा रँक आला नाही. दुसऱ्यांदा रँक मिळाल्यानंतर त्यांची ऑडिट व अकाउंट सर्विसेस मध्ये निवड झाली. अंकिता सध्या ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस मुंबईमध्ये आहे. आता यूपीएससी पास करून आयएएस झाले आहेत. अंकिता म्हणते की लहान बहिणीने यावेळी मला खूप साथ दिली. परीक्षेत चांगली कामगिरी करेल असा तिला विश्वास होता. परीक्षांमध्ये तिसरा क्रमांक मिळेल अशी अपेक्षा नव्हती. त्याचवेळी निकाल आल्यानंतर बहिण वैशाली यांनी सांगितले की, तिचा यावर विश्वास बसत नव्हता निकाल चुकीचा वाटला आणि बहिणीला यूपीएससीच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यास सांगितले तेव्हा तिला खात्री पटली.