जागतिक महिला दिन कतृत्वान महीलांचा ठाण्यात सन्मान.
मॅजिकल चार्मेंट यांच्या वतिने सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट व कर्तृत्ववान महीलांचा प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते “आचल पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सध्य स्थितीत अनेक स्तरावर महीला दिन विशेष पुरस्कार सन्मान सोहळे आयोजित केले जातात, मात्र राज्यातील व प्रत्येक जिल्ह्यातील अनेक कर्तुत्ववान महिला अद्यापही पुरस्कारापासुन वंचित आहेत, अशा अनेक महिलांच्या कार्याचा गौरव करुन 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन त्यांना आचल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजिका समृध्दी पाटील यांनी आज प्रसिद्धी माध्यमांना दिली.
मॅजिकल चार्मेट आयोजित 8 मार्च जागतिक महिला दिन विशेष आचल पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हि संकल्पना आयोजक समृध्दी पाटील व विजय पाटील यांच्या संकल्पनेतुन साकार करण्यात आली आहे. रविवार, दिनांक ५ मार्च २०२३ रोजी गडकरी कट्टा, गडकरी रंगायतन, ठाणे येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार असून या सन्मान सोहळ्याचे निवेदन अभिनेत्री सविता हांडे करणार आहेत तसेच या सोहळ्या संपादक सुबोध कांबळे व देवेंद्र शिंदे यांनी माध्यम प्रायोजक म्हणुन मुख्य जबाबदारी पारपाडली आहे. पुरस्कारासाठी राज्यभरातुन निवडप्रक्रिया सुरु असुन ही निवडप्रक्रिया दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मार्यादित आहे, तरी महिला दिन विशेष “आचल पुरस्कार” करिता आपला अर्ज पाठवण्या करीता त्वरित संपर्क करा असे आवाहन समृध्दी पाटील 74001 21417 यांनी केले आहे.
दरवर्षी जागतिक महिला दिवस मोठया उत्साहाने साजरा केला जात असतो. वर्षभरात ज्या कोणी महिलांनी शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात विशेष कार्य केलेलं असतं, तसेच काही महिलांनी एखादे विशेष प्रावीण्य दाखविलेले असते अशा महिलांचा सत्कार केला जातो, सन्मान केला जातो. अनेक संस्था, कार्यालयात महिला दिन साजरा केला जातो. अशा रीतीने महिलांचा सन्मान करणे उचितच आहे. अनेक महिलांनी राजकीय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलंय. अनेक लेखिका आहेत, शिक्षण क्षेत्रातील महिला आहेत. त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलंय. आजही अनेक महिला प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्य करीत आहेत. मुख्य सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, बँक अधिकारी अनेक क्षेत्र आहेत. कुठलं क्षेत्र बाकी नाही. मात्र आजही अनेक महिलांचा याबाबत यथोचित सन्मान झालेला नाही अशा सर्व महिलांचा त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरिता हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
पुरस्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणुन पी.आय. अंजली वाणी, मॉडेलींग क्षेत्रातील पुनम चांदोरकर, पहिली महिला बाऊन्सफ कंपनीच्या संचालिका दिपा परब, सोलापुर जिल्ह्यातील पहिली तरुणी यांचा सहभाग असणार आहे असे समृध्दी पाटील यांनी सांगितले.