पुणे लोकसभा निवडणुकीत जैन समाज निर्णायक भूमिका बजावणार : ललित गांधी.
पुणे शहरात राज्यभरातून व्यवसाय व शिक्षणाच्या दृष्टीने मागील पाच ते दहा वर्षात जैन समाजाचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले आहे व आता पुणे शहरात जैन समाजाची संख्या दीड लाख हून अधिक आहे. पुणे शहरातील विशेष करून पर्वती, हडपसर, शिवाजीनगर, खडकवासला या मतदारसंघात जैन समाजाचे मोठ्या प्रमाणावर वात्सव्य आहे व या विधानसभांमध्ये मध्ये जैन समाज निर्णायक भूमिका बजावू शकतो.
जैन समाज ज्या पक्षाच्या पारड्यात आपले मत टाकेल तो पक्ष निश्चित निवडून येऊ शकतो आणि जैन समाजाची ओळख भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक मतदार म्हणून आहे व त्या अनुषंगाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाई युतीचे लोकप्रिय उमेदवार मुरली अण्णा मोहोळ हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात तीळ मात्र शंका नाही व जैन समाज तन मन धनाने त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जैन समाजाचे राष्ट्रीय नेते ललित गांधी यांनी दिली. भाजपा जैन प्रकोष्ट च्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व पदग्रहण समारंभामध्ये ते बोलत होते.
जैन समाजाच्या युवकांना राजकारणात सक्रिय होण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ मिळावे ह्या हेतुने तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपामध्ये स्वतंत्र भाजपा जैन प्रकोष्ठची निर्मिती केली व आज भाजपा जैन प्रकोष्ठचे संघटन राज्यभरात चांदा ते बांदा पर्यंत निर्माण करण्यात आपल्याला यश आले आहे, 288 विधानसभा मतदारसंघात पैकी 248 विधानसभेत जैन प्रकोष्ठचे समन्वयक नेमले गेले आहेत. प्रत्येक शहर, तालुक्यात व जिल्ह्यात भाजपा जैन प्रकोष्ठचे संघटन आज उभे झाले आहेत असे भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीपदादा भंडारी यांनी यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले.
येणाऱ्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक जैन समाजाच्या मतदारांना मतदान केंद्रा पर्यंत आणायची महत्त्वपूर्ण जबाबदारी बजवायची आहे असेही आव्हान यावेळी संदीपदादा भंडारी यांनी केले.
भाजपामध्ये प्रत्येक सामान्य कार्यकर्ताही सर्वोच्च पदापर्यत पोचू शकतो आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताचे आपले लोकप्रिय उमेदवार मुरली अण्णा मोहोळ आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्याने निस्वार्थपणे काम करावे, तुमच्या कामाची योग्य ती पावती पक्ष निश्चितपणे योग्य वेळ आल्यावर देईल असे यावेळी मा.नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप दादा भंडारी यांनी पुण्याची कार्यकारणी यावेळी घोषित केली. पुणे शहराध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र सुंदेचा मुथ्था , जिल्हाध्यक्षपदी भरत भुरट व युवाप्रमुख पदी मयूर सरनोत यांची निवड करण्यात आली. महामंत्रीपदी श्रीमल बेदमुथ्था व राजेश सालेचा यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बाफना, निमेश शहा, श्रुती मेहता, प्रदेश सचिव गिरीश पारख, प्रवीण ओसवाल, प्रकाश बोरा, महेंद्र कांकरिया, जयश्री तलेसरा, पंकज भंडारी, सतीश पाटील, अनिल लुणावत, सौरभ धोका, कुंतीलाल चोरडिया वर्षा पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र सूंदेचा मुथ्था यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते तर नियोजन प्रदेश महामंत्री प्रीतीताई पाटील यांनी केले.
पुढील हप्त्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात जैन समाजाचा मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी नवनिर्वाचित शहराध्यक्ष महेंद्र सुंदेचा मुथ्था यांनी केली.