जरंडी ग्रामपंचायत सुविधांच्या बाबतीत मारणार पहिला नंबर, मुख्याधिकारी डॉ. गटणे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाटोदा ग्राम पंचायतीनंतर त्याच पॅटर्नवर आधारित जरंडी ग्रामपंचायतीने वाटचाल केली असून बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण होत आहे . त्यामुळे आता जरंडी ग्राम पंचायत जिल्ह्यात हायटेक झाली आहे .
गावातील शंभर टक्के कर भरणा केलेल्या ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत दळण करण्यासाठी नवीन पीठ गिरणी तसेच गावाला ग्राम पंचायतीने सी.सी.टी.व्हीच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले असून गावाच्या मुख्य चौकात सी.सी.टी.व्ही बसविण्यात आले आहे . तसेच वन महोत्सव निमित्ताने दहा एकर वरील क्षेत्रात चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली
असून बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे यांच्या हस्ते नव्याने मेगा वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनुइल मंगरुळे यांनी दिली असून सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या कल्पकतेतून जरंडी ग्राम पंचायत आता जिल्ह्यात हायटेक बनणार आहे .
गावातील वृद्धांसाठी थोडेसे मायबापासाठी या उपक्रमात जरंडी ग्राम पंचायत कार्यालयाने कक्ष स्थापन केला असून या वृद्धांच्या कक्षाचे बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असून गावातील वृद्धांना मोफत काठ्या आणि पावसाळ्यात छत्रीचे मोफत वितरण करण्यात येवून पिण्यासाठी थंड पाणी व अंघोळीसाठी गरम पाण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे .
कोट १ ) पाटोदा ग्राम पंचायतीच्या धर्तीवर सोयगाव तालुक्यातील मॉडेल ग्रामपंचायत म्हणून जरंडी ग्रामपंचायतीला दर्जा देण्यात आल आहे त्यामुळे आता जिल्ह्यात जरंडीची ग्राम पंचायत हायटेक होणार आहे . या ग्राम = पंचायतीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ , गटणे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण करण्यात येत आहे . प्रकाश नाईक गटविकास अधिकारी सोयगाव .