जरंडीकर सावधान : जरंडी गावात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट. लहान मुले व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरन.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
जरंडी गावात मोकाट कुत्र्यांची दहशत असून गावात सर्व दूर मोकाट कुत्र्यांच्या वावर वाढला आहे या कुत्र्यांना खरूज या रोगाची लागण झाली आहे यातील काही कुत्र्यांना जखम झाल्यामुळे ते पिसाळत असून त्यांच्या बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

दोन दिवासा आगोदर गावात पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांना चावा घेतला होता त्यात दोन लहान मुलांना गंभीर जखमी केले होते व इतर दोन जणांना हाताला व पायाला चावा घेतला होता ही घटना ताजी असतांना अजूनही गावात मोकाट व पिसाळलेली कुत्रे फिरत असल्याने महिला, लहान मुले ग्रामस्थ भयभयीत झाले असून या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे

या कुत्र्यांचा शाळेजवळील आवारात जास्त वावर असल्याने लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरन निर्माण झाले आहे अजूनही गावात दोन पिसाळलेले कुत्रे गावाच्या गल्लीबोळात मुक्तपणे फिरत असून त्यांच्या धाकाने लहान मुलांमध्ये दहशद निर्माण झाली आहे