सोयगाव शहरात वाळू माफियाकडून पत्रकारावर हल्ला; पोलिसात गुन्हा दाखल.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव,दि.१७….अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यां ढम्पर चा फोटो व व्हिडीओ शूटिंग केल्याचा संशय घेत एका दैनिकाच्या पत्रकारवर वाळू माफियाकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पत्रकार जखमी झाला असून, पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर गजमल इंगळे असे पत्रकार यांचे नाव असून, अमोल हिरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
ईश्वर गजमल इंगळे हे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात बातमीबाबत माहिती घेण्यासाठी जात असताना, अमोल हिरे याने त्यांना अडवून माझ्या ढमंपरचे फोटो आणि व्हिडिओ शुटींग का केली असे म्हणत शिवीगाळ केली. त्यांनतर चापट-बुक्क्याने मारहाण करत तू पत्रकारिता कशी करतो म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आपल्याला जीवाला धोका असल्याची तक्रार देत इंगळे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरावरून या घनटेचा निषेध करण्यात येत आहे.
—–आज पत्रकार संघटनेच्या वतीने निदर्शने—–
वाळू माफियांकडून पत्रकारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सोमवारी दि.१७ तहसील कार्यालयासमोर या घटनेच्या निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी दिली आहे.याबाबत सोमवारी सोयगाव पोलीस ठाणे व उपविभागीय अधिकारी विजय कुमार मराठे यांना निवेदन देण्यात येणार आहे.
———पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा—-
पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिसांनी दखल पात्र गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.