पत्रकार दिनाच्या निमित्ताने वसुंधरा परिवारच्या वतीने पत्रकारांचा सत्कार.
पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
राष्ट्रवादी काँग्रेस महिला पुणे शहर उपाध्यक्षा व वसुंधरा परिवारच्या अध्यक्षा सौ योगिता ताई गोसावी यांनी पत्रकारांचा सत्कार करून सन्मानित केले. महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील महत्वाच्या ताज्या बातम्या तसेच चालु घडामोडी लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम पत्रकार करत असतो.
पत्रकार हा एक असा एकमेव व्यक्ती असतो जो जनतेचे प्रश्न समाजासमोर निर्भिडपणे तसेच कुठलाही पक्षपात न करता मांडत असतो. पत्रकार हा समाजाचे सर्वसामान्य जनतेचे ज्वलंत प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत असतो.अणि सर्वसामान्य गरीब दीन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत असतो.
पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे देखील म्हटले जाते आणि म्हणूनच योगिता गोसावी यांनी या दिनाचे औचित्य साधून अखिल मराठी युवा पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष कृष्णा देशमुख, सप्तरंगी दुनिया 24 तास न्युजचे पत्रकार सुधीर भगत, हिंदुसम्राट पेपरचे पत्रकार मंगेश गांधी, पुणे विशेष न्युज नेटवर्कचे पत्रकार अजय कोपनर व राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे जितेंद्र नागवडे यांचा सत्कार करून सन्मानित केले.
यावेळेस सर्व पत्रकारांच्या हस्ते न्युज प्रहार साप्ताहिक यांच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन केले. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व पत्रकार व महिलांनी अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून आलेली विद्यार्थिनी सई काळे हिला योगिता ताई गोसावी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून देणारे पुस्तक भेट म्हणून दिले. या कार्यक्रमात अंजली चव्हाण, दिव्या काळे, सुनेत्रा शेठ, प्रज्ञेश गोसावी व महेश गोसावी इ उपस्थित होते. सर्व पत्रकारांनी आजच्या दिवशी त्यांचा सत्कार करून सन्मानित केल्याबद्दल खूप आभार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. सर्व पत्रकार वेळात वेळ काढून आले याबद्दल योगिता ताई गोसावी यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद