सोयगावचे न्यायमंदिर इतिहासाची साक्ष-न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची ग्वाही -सोयगावला कोनशिला भूमिपूजन
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी (९४२०००७९८३)
सोयगाव, दि.११…सोयगावचे न्यायमंदिर हे विधिज्ञ विभागातील इतिहासाची साक्ष देणारे न्याय मंदिर ठरणार आहे सर्वसामान्यांना या ठिकाणी न्यायदानाचे पवित्र काम होणार आहे त्यासाठी या वास्तूचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या वास्तूला केवळ दगड धोंड्याची इमारत समजून काम न करता न्यायमंदिराचे काम करत असल्याचे भान ठेवावे असा उपदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे (उच्च न्यायालय मुंबई ) यांनी शनिवारी( दि.११) सार्वजनिक विभागाला दिला आहे
सोयगाव न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन व कोणशीला समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते बोलताना त्यांनी विधिज्ञ मंडळींनाही न्याय व्यवस्थेच्या कामाचे धडे दिले ग्रामीण भागातील पक्षकार हा मुंबईच्या पक्षकारांपेक्षा श्रेष्ठ असतो त्याच्यासाठी पुण्याचे काम करा असे त्यांनी आवर्जून सांगितले वकिलांनी बाजू मांडताना न्यायधीशाला आनंद झाला पाहिजे त्यातून पक्षकारांना समाधान लाभते असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर संजय देशमुख(न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई) वाय जि खोब्रागडे(न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई) श्रीमती विभा इंगळे(जिल्हा व सत्र न्यायाधीश छत्रपती संभाजीनगर) अमोल इंगोले (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सीयगाव) ऍड राजेश गिरी (अध्यक्ष तालुका विधिज्ञ संघ) आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ऍड राजेश गिरी यांनी तालुका विधिज्ञ संघाच्या वतीने सत्कार केला.
यावेळी प्रास्ताविक ऍड राजेश गिरी यांनी केले सूत्रसंचालन उज्वला मुसळे सपाटे यांनी केले यावेळी कार्यक्रमासाठी डी एस केळुसकर, सिल्लोडचे कनिष्ठ स्तर दुसरे न्यायाधीश ए बी बिरादार राजेंद्र तुवर,ऍड धर्मराज सूर्यवंशी, ऍड योगेश जावळे,ऍड सचिन गिरी,ऍड अंबादास जाधव, ऍड सारंग देशमुख ऍड पी एम चौधरी,ऍड. सतीश सुर्यवंशी आदींसह न्यायिक अधिकारी(छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड,सोयगाव न्यायालय) जिल्ह्यातील विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी आदींची उपस्थिती होती. आभार सोयगावचे न्यायाधीश अमोल इंगोले यांनी मानले.