इजिप्त येथील जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये अहमदनगरच्या कर्जतचा केला गौरव.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यावरण बदल परिषदेत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरनिय बदल विभागाकडून ”माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत मागील दोन वर्षात राज्यात जे पर्यावरण संवर्धनाचे काम झाले त्याचे सादरीकरण करण्यात आले.इजिप्त मधील शर्म अल शेख या शहरांमध्ये सध्या दोनशे देशांचा सहभाग असलेली पर्यावरण परिषद सुरू आहे. 6 नोव्हेंबर या दिवशी ही परिषद सुरू झाली असून 18 नोव्हेंबर या दिवशी समाप्त होणार आहे. जागतिक पर्यावरणाच्या संदर्भात ही परिषद सुरू असून या ठिकाणी भारताचे वतीने प्रतिनिधित्व करणारे अधिकारी प्रवीण दराडे महाराष्ट्र शासनाने मागील दोन वर्षांपासून राज्यामध्ये माजी वसुंधरा या अभियान राबवले. या अंतर्गत कर्जत नगर पंचायत ने मागील दोन वर्षात केलेले कामकाज याठिकाणी मांडण्यात आले.
लोकसहभागातून या ठिकाणी झालेल्या सर्व कामांचा उल्लेख करण्यात आला. यात 50,000 पेक्षा अधिक वृक्षांचे रोपण, सर्व रस्त्यांच्या दुतर्फा करण्यात आलेले वृक्षारोपण , 21 हरित क्षेत्रांची निर्मिती , 5 miyawaki projects, 3 विहिरींचे पुनरुज्जीवन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स 6:30 – 7:30 या कालावधीत मागील 775 दिवसांपासून सामाजिक संघटनांचे जे पर्यावरणासाठी श्रमदान सुरु आहे त्याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला.
या उल्लेखामुळे कर्जतकरांची छाती अभिमानाने उंचावली आहे व कर्जतकरांचा आवाज आता थेट जगाच्या नकाशावर पोहोचला आहे.शहराचा झालेला हा गौरव निश्चितच देशाचे राज्याचे आणि तालुक्याचा गौरव वाढवणारे आहे.
कर्जत शहरामध्ये पर्यावरणासाठी मागील दोन वर्षांपासून सर्वसामाजिक संघटना , नगरपंचायत चे कर्मचारी अतिशय चांगले काम करत आहे. माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता व हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या कामाची जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये दखल घेण्यात आली आहे.
कर्जत नगरपंचायत ने पर्यावरणासाठी केलेल्या कामाचा उल्लेख जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये झाल्यामुळे निश्चित सर्वांना आनंद झाला. सर्वसामाजिक संघटना नगरपंचायत सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आणि मुख्य शहरातील सर्व नागरिक यांच्या योगदानामुळे हे यश मिळाले आहे. असे मत कर्जत नगरपंचायतचे गोविंद जाधव मुख्याधिकारी यांनी व्यक्त केले.