” तू आई वडील अन बहिणीला सोडून दे नाहीतर…” प्रेम प्रकरणातून तरुणाने उचलले चुकीचे पाऊल.
आजकालच्या युगात प्रेमाने एक नवीन मार्ग निवडला आहे. प्रेमात काही लोक नको त्या थराला जाऊन बसतात. आपण आपल्या सभोवताली खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रेम प्रकरण पाहिले असतील. प्रेम प्रकरणातून पळून जाणे, प्रेम प्रकरणासाठी काही गुन्हे करणे, प्रेमामुळे आरोपी बनाने अशा बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात. पण या बातमीमध्ये थोडसं वेगळं घडलं आहे. ही घटना अकोला मधील आहे अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम इथली ५ ऑगस्ट रात्री सात वाजताच्या सुमाराची ही हृदयद्रावक घटना घडलेली आहे.
तुझ्या आई वडिलांना सोड तेव्हाच लग्न करणार. अशी प्रेयसी तरुणाला अट घालते सर्व काही सुरळीत चालू होतं. मात्र प्रेयसीने लग्नाला नाही म्हटलं आणि रिलेशनशिप मध्येच राहायचं असा हट्ट तिने धरला. आणि यामुळे त्या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. अखेर या वादाला वैतागून या तरुणाने भयंकर पाऊल उचलले. या तरुणाचे नाव अक्षय असे आहे प्रेयसीच्या वादाला कंटाळून या अक्षयने पुलावरून नदीत उडी घेत आपले जीवन संपवला आहे.
सदरील मुलगा अक्षय वय वर्ष 25, 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास अकोट – अकोला मार्गावर असलेल्या गांधीग्राम च्या पूर्णा नदीच्या पुलावर मोटरसायकल उभा करतो. बऱ्याच वेळ विचार करत त्या ठिकाणी तो फिरला. आणि थेट नदीत उडी घेतली. तेथील काही स्थानिकांनी हा प्रकार पाहिला आणि याबाबतची माहिती दहीहंडा पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी हजर झाली शोध बचाव पथकाला बोलावण्यात आले. आणि त्या अक्षयची शोध मोहीम सुरू झाली. मात्र अक्षयचा शोध लागला नाही.
घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचं एका तरुणीवर प्रेम होतं. गेल्या दीड वर्षापासून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. त्या दोघांमध्ये बऱ्याच वेळात वाद व्हायचे. आणि या वादाचं कारणही तेवढेच मोठं होतं. प्रेयसीने लग्नासाठी बऱ्याच अटी ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये आई वडिलांबरोबर राहायचं नाही, बहिणीसह आई-वडिलांना सोडून दे कारण तुझ्या आई वडिलांनी तुझ्यासाठी काहीच कमावलं नाही. हे सर्व करणार असेल तरच लग्नाला होकार देईल असा हट्टच त्या तरुणीने धरला होता. अनेकदा पोलिसात लेखी स्वरूपात तक्रारी दाखल झाली आहे. एकमेकांना लिहून देऊन लग्नालाही होकार झाला मात्र अचानक त्यांच्यामध्ये आता नवीन काय वाद झाला आणि परत असं काय झालं की या अक्षयने एवढे मोठे पाऊल उचलले हे सध्या गुपित आहे.
ही घटना घडल्यानंतर अक्षयच्या घरचे म्हणतात की, आज आमचा पोटचा जीव गेलाय, त्या तरुणीने अक्षयला कुठलाच नाही ठेवलं. तिच्यामुळे तो कायम तणावत राहत असायचा. जर त्या तरुणीचा फोन नाही आला तर अक्षयला मोठ टेन्शन यायचं. त्याने तिला सोडून द्यायचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर ती घरी यायची, आणि अक्षय सोबत भांडण करून त्याला मारहाण देखील करायची. याचप्रमाणे अशा अनेक गोष्टींनी तो त्रासला होता. टेन्शन घेणे रडणे वगैरे आम्हाला पण बघवत नव्हतं. अशी प्रतिक्रिया अक्षयच्या घरच्यांनी व्यक्त केल्या.