रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये नागपंचमीनिमित्त व्याख्यान; सापांना मारण्याऐवजी सर्पमिञांना कळवा – सर्पमिञ संतोष लाकडे
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख,
नागपंचमी निमित्ताने रेसिडेन्सील हायस्कूल मध्ये खास संतोष लाकडे यांचे व्याख्यान मध्ये बोलत होते,निसर्गातील महत्त्वाचा घटक आणि परिसंस्थेतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून सापांची ओळख आहे.
हे मूल्य जाणूनच भारतीय संस्कृतीने सापांना पूजनीय बनविले आहे. परिणामी नागपंचमीच्या दिनानिमित्ताने का होईना सापांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. हा दिन साजरा करण्यामागचा उदात्त हेतू बाजूला सारून नाग किंवा सापाला दूध पाजणे, त्यावर हळद-कुंकू टाकून त्याची पूजा करणे यासारख्या अंधश्रद्धायुक्त प्रथा पाळल्या जात आहेत.
साप दूध पित नाही किंवा त्यावर हळद-कुंकू टाकू नये, याचा प्रचार आणि प्रसार दरवर्षी केला जात असला तरी रुढींच्या ताब्यात असलेल्या या बाबी कमी होताना दिसत नाहीत असे मत जे.बी.एस.एस पर्यावरण विभाग संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मा. संतोष लाकडे यांनी व्यक्त केले. ते रेसिडेन्शिअल हायस्कूल व राष्ट्रीय हरित सेना आयोजित व्याख्यानामध्ये बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी वेगवेगळ्या सापांची माहिती दिली. सर्प हे पर्यावरणामध्ये आवश्यक आहे नागपंचमीला नाग देवतेची पूजा केली जाते. एखादेवेळी आपल्या घरामध्ये एखादा साप निघाला तर सर्प मित्राला फोन करून तो पकडण्यास सांगावे . असे आव्हान केले.याप्रसंगी सर्पमित्र संतोष लाकडे व विशाल गोरे यांचा विद्यालयाचे वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड, उपप्राचार्य लक्ष्मण सोळसे ,पर्यवेक्षिका छाया शिंगटे तसेच हरित सेना विभाग प्रमुख नितीन भुसारी आदी उपस्थित होते. त्याबरोबर विद्यालयातील सर्व विद्यार्थी , सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या व्याख्यानाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गव्हाळ यांनी केले तर आभार रामनाथ काळे यांनी मानले.