सावळदबारा सरपंचपदी कृषीमंत्री अब्दुल सत्तार समर्थकांची वर्णी.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील अत्यंत महत्वाचे समजल्या जाणाऱ्या सावळतबारा गावच्या सरपंच पदी कृषिमंत्री अब्दुल सत्तार समर्थक शिवगंगा शिवप्पा चोपडे यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने गावात जल्लोष करण्यात आला.
आज दिनांक 10 फेब्रुवारी 2023 वार शुक्रवार रोजी सावळदबारा ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड प्रक्रिया होती. सकाळी दहा ते बारा पर्यंत उमेदवारी अर्ज भरणे , बारा ते एक पर्यंत छाननी, एक ते दोन पर्यंत माघार व दुपारी दोन वाजता सरपंच पदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच पदासाठी शिवगंगा शिवाप्पा चोपडे ,ज्योती विनोद टिकारे, मीनाक्षी सुनील या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले . यामध्ये दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार समर्थक शिवगंगा शिवप्पा चोपडे यांना सहा मते मिळाल्याने त्यांना विजय घोषित करण्यात आले. ज्योती विनोद टिकारे यांना चार तर मते पडली तर मीनाक्षी शिप्पलकर यांचे मत बाद झाले.
या निवडीसाठी उपसरपंच मोहम्मद आरिफ लुखमान, ग्रामपंचायत सदस्य मोहन सुरडकर, संदीप सूर्यवंशी, सैनाज तडवी, तायराबी शेख हे उपस्थित होते. शिवगंगा चोपडे यांची सरपंच पदी निवड होताच बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शिवाप्पा चोपडे , माजी सरपंच लोकमान शेठ , माजी सरपंच दारासिंग चव्हाण , माजी सभापती सांडूभाऊ तडवी , घाणेगाव सरपंच सुरेश चव्हाण, मोलखेडा सरपंच ज्ञानेश्वर वारंगणे, उपसरपंच गुलाब राणा , कैलास शेळके, टीटवी सरपंच भागवत जाधव, कनीराम भाऊ, ढाबा सरपंच राहुल हिल्लोडे, ग्रामपंचायतचे रामेश्वर भाऊ, ईश्वर शेळके, पिंपळवाडी सरपंच गंगाधर सदाशिव, उपसरपंच कैलास मुळे, माजी सरपंच मैताप तडवी, माजी सरपंच किसन सूर्यवंशी , मा.चेअरमन पंजाबराव देशमुख , माजी सरपंच मोहम्मद फिरोज ,मोहम्मद लुखमान, निलेश आप्पा चोपडे , मुकुंदा मानकर ,अशोक देशमुख , प्राची तडवी , फिरोज खा शेख गफार, भीमा शेळके, अमजद तडवी ,अनिल पाटील ,विजय कुली , प्रमोद साखरे, भास्कर पाटील , संजय देशमुख, गजानन चोपडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.