लोखंडेंच्या ” लाडकी उद्योजिका ” मुळे महिला सक्षमीकरण – संगीताताई खोडान.
योगभवन व सोलर कोल्ड रूमचे लोकार्पण.
श्रीरामपूर:
राज्यामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली या योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये महिन्याला मिळतात, मात्र येथील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण उद्योजिका योजना यामुळे येथील महिला उद्योजिका बनवून खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल असा विश्वास शिवसेनेच्या संपर्कप्रमुख, समन्वयक संगीताताई खोडान यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरा येथे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेतून सुमारे ८० लक्ष रुपयांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योगा भवन व सोलर कोल्ड रूमचे लोकार्पण व श्रीरामपूर शहरातील सोलर गोल्ड रूम चा लोकार्पण सोहळा शिवसेनेच्या समन्वयक संगीताताई खोडान यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आ. चंद्रशेखर कदम ,अडबंगनाथ देवस्थानचे महंत अरुणनाथगिरी महाराज, उंबरगावचे आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर, महा किसान संघाचे चेअरमन प्रशांत लोखंडे, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, निवृत्त सहाय्यक जिल्हा चिकित्सक वसंतराव जमधडे ,शिवसेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, प्रा. सतीश राऊत, दादासाहेब कोकणे राजेंद्र देवकर, पोर्णिमा देवकर, राजश्रीताई होवाळ,, रोहित शिंदे, किरण वेताळ, विशाल शिरसाट, सुनील गायकवाड, सत्यनारायण गौर, पुष्पाताई धनवटे, मंगेश खरपस, उपजिल्हाप्रमुख राजेश तांबे ,लक्ष्मण पाचपिंड ,प्रसिद्ध उद्योजक अभिजित राका ,संपत जाधव ,शिवाजी कपाळे ,गोरक्षनाथ मुसमाडे, देवेंद्र लांबे, प्रशांत कदम, भाऊसाहेब पगारे, नंदाताई लोखंडे, प्रियंका ताई लोखंडे, महिला आघाडीच्या विमलताई पुंड ,देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी विकास नवाळे ,जिल्हा उद्योग केंद्राचे अशोक बेनके ,मावीमचे प्रतिनिधी महेश अबुज ,प्रसिद्ध विधीज्ञ सुभाष जंगले, दिपाली चित्ते ,वैशाली चव्हाण, भैरवनाथ नगरच्या लोकनियुक्त सरपंच दिपालीताई फरगडे ,प्रवीण फरगडे उपसरपंच चंद्रभागाबाई काळे ,उमेश पवार, शुभम वाघ, राहुल उंडे,महेंद्र पठारे, भैया भिसे, आदित्य आदिक, रवी जाधव, संजय शिंदे ,रेखा चाटे, स्वाती निरगुडे, वर्षा पाठक ,दत्तात्रय पुंडे, आशाताई गोरे, प्रफुल्ला पठारे ,तृप्ती जगदाळे , हिना शेख, मनीषा वाडकर, पुष्पाताई धनवटे, वंदना अल्हाट, प्रतिभा दंडवते ,अश्विनी चव्हाण, संगीता ठोंबरे ,कल्पना काळे ,विजयकुमार तांबे आदि यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ.खोडान म्हणाल्या माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांनी लंडनला शिक्षण घेऊन येथील महिलांना उद्योजिका बनवण्याचा ध्यास घेतला आहे, त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे अर्थसहाय्य ते उपलब्ध करून देणार आहेत त्यामुळे महिलांना स्वतःची ओळख निर्माण होईल. प्रशांत लोखंडे च्या माध्यमातून तुमचे अस्तित्व निर्माण होणार आहे रक्ताच्या भाऊ सर्वांनाच असतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रशांत लोखंडे यांनी लाडकी बहीण उद्योजिका योजना आणली. यासाठी तुम्हाला महा किसान संघ कृषी प्रोडूसर कंपनी मार्फत सोलर ड्रायर उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे अर्थसहाय्य ते उपलब्ध करून देतील शिवाय तयार होणारा माल ते स्वतः चांगल्या भावात खरेदी करणार आहेत, त्यामुळे आता श्रीरामपूर मध्ये लाडकी बहीण उद्योजिका योजना सगळीकडे होणार आहे .काही दिवसांनी ही योजना राज्यामध्ये ही राबवली जाऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अरुणनाथ गिरी महाराज म्हणाले, जनहिताची भावना लक्षात घेऊन माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या मतदारसंघात त्यांच्या संकल्पनेतून ६ ठिकाणी योग भवन बांधले, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे .
माजी खासदार लोखंडे म्हणाले, येथील जनतेने माझ्यावरती नेहमीच प्रेम केले २०१४ ला १७ दिवसात खासदार केले ,पुन्हा २०१९ ला ही खासदार केले .२०२४ ला ही या ठिकाणी प्रेम केले. आपण नेहमी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले, हा मतदारसंघ साखर सम्राट यांचा आहे. मात्र त्यांच्या नादी न लागता कांदा उत्पादक येथे जास्त आहे त्यांना न्याय देण्यासाठी प्रशांत लोखंडे यांनी महा किसान संघामार्फत कांदा खरेदी केंद्र, सोयाबीन ,मका ,हरभरा सुरू केले आता कांद्यावरती प्रक्रिया करून ग्रामीण व शहरी भागातील महिलांना लाडकी बहीण उद्योजिका ही संकल्पना त्यांनी आणली आहे. येथील शेतकरी खराब झालेला कांदा उकिरड्यावर टाकायचा तो कांदा आता सोलर ड्रायर द्वारे सुकून खरेदी करणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना महाकिसान संघाचे चेअरमन प्रशांत लोखंडे म्हणाले, कोरोना काळामध्ये वडिलांसोबत बोलत असताना, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली .आम्ही अगोदरपासून कांदा सुकून पावडर तयार करण्याचे काम करत होतो आणि आजही तो प्रोजेक्ट आमचा सुरू आहे, मात्र यासाठी बाहेरून काय कांदा आणावा लागतो म्हणून येथील शेतकऱ्यांना व महिलांना उद्योजिका बनवण्याची संकल्पना डोक्यात आली .शेतकरी कांदा चाळीमध्ये साठवणूक करतात व त्यातील खराब झालेला कांदा उकिरड्यावर फेकतात तो खराब झालेला कांदा कटिंग करून सोलर ड्रायर द्वारे सुकवून घेतल्यास तो आम्ही विकत घेऊ .यासाठी महाकिसान संघ कृषी प्रोडूसर कंपनी कडून सोलर ड्रायर देणार आहोत .या सोलर ड्रायर साठी लागणारे अर्थसहाय्य बँकेमार्फत उपलब्ध करून देणार ,बँकेसाठी हमी कंपनी देणार आहे .यासाठी सरकारकडून ३५ टक्के सबसिडी आहे. त्यामध्ये फक्त कांदाच सुकवता येणार नाही तर पापड व इतर खाद्यपदार्थ सुकवता येतील व त्यासाठी लागणारे मार्केट आम्ही उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे मार्केटिंगचा विषय संपणार आहे.तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीरामपूर शहरात ३ठिकाणी देवळाली प्रवरा येथे ३ ठिकाणी कोल्ड स्टोरेज रूम करण्यात आले, असून त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल ठेवता येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी माजी आ. चंद्रशेखर कदम, प्रा. सतीश राऊत, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमलताई पुंड, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, जिल्हा उद्योग केंद्राचे अशोक बेलके आदींनी मनोगते व्यक्त केली .