अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन जाणं ” त्याला ” पहा किती महागात पडले.
एखाद्या अल्पवयीन मुलीला पळून नेणे किती महाग पडू शकते हे आपल्याला या बातमीतून समजून येईल आपण गुन्हेगारीच्या बऱ्याच बातम्या पाहत असतो मुलं किंवा मुली सोशल मीडियाच्या आहारी जाऊन नको ते पाऊल उचलत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज, पिक्चर बघून मुलं काहीतरी चुकीचं करून बसतात अशीच एक बातमी अहमदनगर मध्ये घडली आहे.
अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला पळून नेणाऱ्या आरोपीला बस स्थानकाहून ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना कडा बस स्थानकात जातात त्या ठिकाणी एक मुलगा व मुलगी पोलिसांच्या नजरेस आले त्या दोघांनाही विचारपूस केली असता मुलाने उत्तर दिली आणि त्यामुळे पोलिसांना संशयाला पोलिसांनी वरिष्ठांना कळवून त्या मुलाला व मुलीला चौकशीसाठी कडाचौकीन नेले त्या ठिकाणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मुलाने त्याचे नाव ओम दांडगे असं सांगितलं.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गुगल वडगाव येथील तो असल्याचे त्यांनी सांगितलं पोलिसांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फोन करून मुलगा व मुली बाबत विचारपूस केली, श्रीगोंदा पोलिसांनी ओम दांडगे यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मुलीस पळून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यावरून कडा पोलिसांनी आरोपी मुलास आणि अल्पवयीन मुलीस श्रीगोंदा पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.