जगाच्या पाठीवर

प्रभू श्रीराम कट्टर भक्त “हनुमान”ला पाठवली नोटीस, ” अतिक्रमणमधून निघून जा नाहीतर…”पहा बातमी सविस्तर .

चक्क हनुमानाने अतिक्रमण केल आहे. या देवबाप्पाला आपल घर हलवण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने दिली आहे, 91 वर्षापासून ताबा मारून बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला भक्ती मंडळींनी आपली वस्ती उभारली आहे याचाच त्रास झारखंड रेल्वेला होत आहे. भारतीय रेल्वेने झारखंडमधील धनबाद शहरात एक अजब प्रकार समोर आला आहे. भारतीय रेल्वेने चक्क भगवान हनुमानाला नोटिस पाठवली आहे.

त्यामुळं आश्चर्च व्यक्त केले जात आहे. दहा दिवसांत मंदिर हटवण्यात यावं आणि रेल्वे विभागाला जमीन सोपवण्यात यावी, असं नोटिशीत म्हटलं आहे. शहरातील बेकार बांध परिसरात असलेल्या मंदिरात चिटकवण्यात आली आहे. यात थेट भगवान हनुमानांचा उल्लेख करण्यात आला आहे. मंदिराने अतिक्रमण करत रेल्वेच्या जमिनीचा ताबा घेतला आहे. तसंच, येथील स्थानिकही अनधिकृतपणे या जागेवर राहत असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.

१० दिवसांच्या आत ही जागा रिकामी करण्याचे आदेश रेल्वेकडून देण्यात आले आहेत. अन्यथा, मंदिर तसेच स्थानिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा रेल्वेने दिला आहे. १९३१ साली बांधण्यात आलेले हनुमानाचे मंदिर आहे. तेव्हापासूनच येथील स्थानिक या मंदिरामध्ये दैनंदिन पूजापाठ करतात.दरम्यान, रेल्वेच्या नोटिशीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मंदिराजवळच वस्ती असून तिथे जवळपास पाच डझन लोकांना अतिक्रमण विरोधात नोटिस पाठवली आहे. त्याचवेळी तिथे असलेल्या हनुमान मंदिरालादेखील अतिक्रमण असल्यास नोटिशीत म्हटलं आहे.

अतिक्रमण हटवण्याची नोटिस आलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, ते तिथे १९२१पासून राहतात. फळं, मासेमारी, भाज्यांसह अन्य छोटे-मोठे व्यवसाय करुन ते आपला उदरनिर्वाह चालवतात. मंगळवारी नोटीस मिळाल्यानंतर वस्तीतील सर्व रहिवाशी मंदिराभोवती जमले होते व रेल्वेच्या नोटिशीचा विरोध केला.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!