गुन्हेगारी

उत्साहात हरपलं भान ! किस केल्यानंतर गर्लफ्रेंडला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये भरती.

अस होऊ शकत का ? यावर विश्वास बसन थोड कठीण आहे मात्र एका मॉडेल सोबत अस घडल आहे,हा किस्सा सोशल मिडीयावर viral होत आहे , एक मुलगी आयुष्यातील तिचे ‘पहिले चुंबन’ कायम लक्षात ठेवेल, परंतु चांगल्या कारणास्तव नाही तर एका अपघातामुळे. खरं तर या ‘किस’मुळे महिलेला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. पहिल्या डेटला तिच्या बॉयफ्रेंडने तिला असं किस केलं की तिची जीभ कापली गेली. तिची ही ‘वेदनादायी’ कहाणी आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

ती तुर्कस्तानची मॉडेल आहे. 34 वर्षीय सेडा एर्सोईने रुग्णालयातून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने सांगितले आहे की ती एका मुलासोबत पहिल्या डेटवर गेली होती. यावेळी दोघांनी फ्रेंचला किस करायला सुरुवात केली, पण तेवढ्यात त्या मुलाने उत्साहात आपले भान गमावले आणि सेडा ला इतक्या धोकादायकपणे किस केले की तिची जीभ कापली गेली.

तिचे संपूर्ण तोंड रक्ताने भरले होते आणि अखेर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यानंतर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली.डॉक्टरांना तिची जीभ शिवावी लागली. सध्या तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कदाचित तिच्या बॉयफ्रेंडला फ्रेंच किस कसे करावे हे माहित नव्हते, म्हणून हा अपघात झाला.

जेव्हा सेडाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या. कुणी म्हणतंय की हे खूप विचित्र आहे, तर कुणी म्हणतंय ‘तुम्ही एलियनला किस केलं की ड्रॅगनला’. सेडा एर्सोई ही एक प्रसिद्ध तुर्की मॉडेल आहे. तिने 2010 मध्ये मिस फोटोमॉडेल कॉम्पिटिशनचा किताबही जिंकला आहे. ती इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर त्याचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!