” प्रेम जिंकवते, तसेच प्रेम गुंतवू शकते.” हल्लेखोर माकडाला जाळ्यात गुंतवण्यासाठी…पहा हे काय केलं.
हनी ट्रॅपच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. खून मारामाऱ्या आणि गुन्हेगारी देखील वाढली प्रतिष्ठित लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणं आणि त्यानंतर त्यांची लूट करणं अशा पद्धतीच्या घटना नगर जिल्ह्याला काही नव्या नाही येत.
मात्र ही बातमी गजब आहे हल्लेखोर माकडासाठी हनी ट्रॅप लावला, वन विभागाने अनोखी शक्कल लढवलीय 25 हून अधिक लहान मुलांवर हल्ले करत. दहशत माजवणाऱ्या या माकडाला जाळ्यात पकडण्यासाठी वन विभागाने अनोखी शक्कल लढवली.
त्या माकडावर प्रेमाचं जाळ टाकला. माकड ही तिच्या प्रेमाला भुलल त्याचवेळी या माकडाला भूलीचे इंजेक्शन देऊन जेर बंद केल. माकडावर केलेल्या हनीट्रॅप मुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आणि इथून पुढे हा माकड कुठल्याही प्राण्यांवर हल्ला करणार नाही. अनोख्या पद्धतीचा हा हनी ट्रॅप चर्चेचा विषय ठरला.
बिर्वेवाडी ,साकुर परिसरात माकडांना लहान मुलांवरती दिवसेंदिवस हल्ले करायचं सत्र वाढलं होतं. दोन लहान मुलींना माकडाने चावा घेतला त्यांना रुग्णाला दाखल केलं. रस्त्याने येणार जाणाऱ्यांच्या अंगावरती हे माकड धावून जायचं हल्ला करत असे. यात विशेषतः माकड लहान मुलांना लक्ष करत होतं. एका महाविद्यालयात घुसलं होतं, विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं होतं माकडायला पकडण्यासाठी ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली होती. मात्र या माकडाला पकडण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न करून देखील वन विभागाला अपयश येत होत.
हे हनी ट्रॅप कसं झालं ?
एका वस्तीवर माकड असल्याचा समजताच माकडीणला तिथे आणून सुरक्षित ठिकाणी ठेवला. काही खाद्यपदार्थ ठेवले काही वेळानं ते माकडीनी जवळ आलं. वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी या माकडावरती नजर ठेवून होते, सावज ताब्यात येताच कर्मचार्यांनी त्यांच्या साह्याने डॉट मारला आणि त्याला पकडण्यासाठी जाळी टाकली. दहशत माजवणाऱ्या या माकडाला कुणीतरी पाळले असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्याला सोडून दिलं जावं अशी महिती वन विभाग यांच्या कडून प्राप्त झाली.