लव्हमॅरेज, चारित्र्याचा संशय म्हणून म्हणून पतीने चार्जरने तिच्यासोबत केले असे काही, पहा बातमी सविस्तर.
पती-पत्नीमध्ये संशय आला तर त्या नात्याला नजर लागते, अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. बऱ्याचदा पती हा सतत कामानिमित्त बाहेर असतो आणि पत्नी घरी आपला घर संसार सांभाळत असते. अशावेळी पती तिच्यावरती संशय घेतो आणि याच संशयावरनं तिला मारहाण करतो त्रास देतो हे प्रकार घडत असतात मात्र जळगावत अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला.
चारित्र्याच्या संशयावरुन सविता जितेंद्र पाटील (वय २०) या महिलेचा पतीनेच मोबाईल चार्जिंग करण्याच्या कॉडने (वायर) गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी सायंकाळी निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर रस्त्यावरील खुबचंद साहित्या टॉवर ब्रम्हांडनायक अपार्टमेंट घडली.
जितेंद्र संजय पाटील (वय २५, रा. बांभोरी, ता.धरणगाव) असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. खून केल्यानंतर जितेंद्र स्वतः पोलिसात हजर झाला.
सविता व जितेंद्र हे दाम्पत्य आठ दिवसापूर्वीच या फ्लॅटमध्ये वास्तव्याला आले होते. दोघांचा प्रेमविवाह झालेला असून दीड वर्षाची मुलगी आहे. तिला दोघांनी सोबत आणले नव्हते. जितेंद्रच्या आई, वडिलांकडे ही मुलगी रहात होती. चारित्र्याच्या संशयावरुन खून केल्याची कबुली जितेंद्रने दिल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली.
या दोघांचा हा प्रेम विवाह होता आणि याच प्रेमविवाहाचा शेवट अत्यंत भयावह झाला. गैरसमजातून संशय घेऊन या नराधमाने विवाहितेचा खून केला. स्वतः पोलिस स्टेशनला हजर झाला.