विज का कापली म्हणत एका इसमाने M.S.E.B. कर्मचाऱ्यास अश्लिल शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी.

विजय चौधरी-औरंगाबाद प्रतिनिधी
दि:२२ रोजी सिल्लोड येथील विदयुत महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ अंकुश लक्ष्मण सहाने हे त्यांच्या सहका-यासह वीज बिज वसूलीसाठी सिल्लोड शहरातील घुम्मट मश्जीद परिसरातील मोसीन मुसा शेख यांच्या कडे गेले असता त्यांना त्यांनी विचारणा विचारले की,तुम्ही वीज बिल भरले का नाही
तेव्हा त्या इसमांनी महावितरणच्या कर्मचारी असलेल्या अंकुश सहाने यांना दमदाटी व दादागिरीची भाषा वापरुन धमकी दिली की,तुम कौन है मुझे बिल पुछले वाले मै नही भरता जो करना है ओ करलो अशी भाषा वापरली तेव्हा हे महावितरणचे कर्मचारी यांनी त्या इसमाचे विज बिल न भरल्यामुळे कनेक्शन कट केलेले होते ते कट केलेले विज कनेक्शन बिल न भरता त्या इसमांनी बेकायदेशीर ते कट केलेले बिज कनेक्शन पुन्हा परस्पर जोडून सुरु केले होते हेच त्या इसमाला अंकुश सहाने या विज कर्मचाऱ्यानी विचारले की तुम्ही असा कायदा हातात घेणे बरोबर नाही वरिष्ठांना आम्हाला सांगाव लागेल तेव्हा तो इसम म्हणाला की, कौन हे तुम्हारा साब उनको बुलाओ हम किसी के बाप को डरते नही है
तुमको ही नौकरी करना है तो सिधी करो नही तो तुझे जिना हराम कर देंगे अशा प्रकारची धमकीची भाषा त्या इसमांनी अंकुश सहाने या विज कर्मचाऱ्याला वापरुन व अश्लिल शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा मुकीम पठाण नावाचा सहकारी सुद्धा सोबत होता सदर घटना ही आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.
सदर भयभीत झालेला कर्मचारी अंकुश सहाने यांनी त्यांचे सिल्लोड विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या कानावर ही घटना टाकताच अतिरिक्त कार्यकारी अभियंता लहाने, उपकार्यकारी अभियंता बनसोडे, सहाय्यक अभियंता सैवर, यांनी सदर इसमाच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्या अन्याय ग्रस्त विज बिल लसूली कर्मचारी अंकुश लहाने यांना परवानगी देऊन ते आपल्या संपूर्ण कर्मचारी सह होते.
त्यामध्ये खान भुईगळ मॅडम. सपकाळ, कुदन , तडवी, मकासरे, वेलदोडे,समाधान नवगिरे, कारण प्रास्किर, विलीग रचफ, चंडील, वांगे, सावळे, मांडे , देशपांडे, भेंडे , गणेश जाधव, साजीद पठाण, जनार्दन, माळकरी. माकोडे.हे सर्व शहर पोलीस सिल्लोड येऊन फिर्याद देऊन कारवाईची मागणी केली. त्या फिर्यादीवरुन सदर विज चोर मोसीन मुसा शेख याच्या विरुद्ध भादवी कलम १८६,३४,५०४ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.