साई मिडासवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई: परवानगी न घेतल्याने काम तात्काळ थांबवा
अहमदनगर (प्रतिनिधी) झोपडी कॅन्टीन परिसरातील दूध संघाच्या जागेवर उभी राहिलेली साईमिडासची ही टोलेजंग इमारत आणखी अडचणीच्या भीवऱ्यामध्ये अडकत चालली आहे. या वादग्रस्त इमारतीचे बिल्डिंगचे बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. त्याची परवानगी न घेतल्याने हे काम तात्काळ थांबवा अशी मोठी कारवाई मंडळांने केल्याने नगरमध्ये लँड माफिया आणि बांधकाम व्यवसायिकांच्या चर्चेत आपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे.
या संदर्भात काँग्रेस नेते दीप चव्हाण आणि शहर सहकारी बँकेचे विश्वस्त संजय घुले यांनी जेष्ठ विधीज्ञ अभिजीत पूप्पाल यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार केली होती.
दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बांधकाम असेल तर हरित आयोग, प्रदूषण नियंत्रण मंडळ रीतसर परवानगी घ्यावी लागते. ती घेतली गेली नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले होते त्यांना त्यात त्रुटी आढळून आल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे.
मंडळाने मनपा आयुक्त यांना थेट आदेश काढून साईमिळास ऑरम बिजनेस हब अँड ओ आर ओ रेसिडेन्स अहमदनगर या इमारतीवर तात्काळ कारवाई करा. याचे सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवा असा थेट आदेश दिला आहे.
या संदर्भीय विषयास अनुसरून प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक यांनी 22 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये साई मिडास प्लॉट नंबर (44 अधिक 44/1)/1 व (44 अधिक 44/1)/2, फायनल प्लॉट नंबर 44 44/1 या प्लॉटवर सुरू असलेल्या बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून अनुमती पत्र आणि पर्यावरण विभागाचे संमती पत्र घेतले नसल्याने सदर इमारतीचे बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.
दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त जर बांधकाम औद्योगिक, व्यावसायिक किंवा घरगुती प्रकारात जर करायचे असेल तर या स्क्वेअर फुटात राहण्यास जाणाऱ्या लोकांकडून ते वापरत असलेले पाणी हवा अन्न यातून जो मैला तयार होईल. सांडपाणी गटारीत जाईल हवा प्रदूषित होईल त्यानुसार त्या बांधकाम व्यावसायिकाने सदर इमारतीत विशिष्ट तरतुदी करून मैला, कचरा विल्हेवाट लावण्याआधी वर प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक असते.
पण या ठिकाणी अधिकाऱ्यांना तसे काहीच दिसले नाही. ही इमारत जर पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर त्याचा नगरच्या प्रदूषणावर घातक असा परिणाम होण्याची शक्यता होती.
अगोदरच साईमिडा स महानगरपालिकेकडून मिळवलेल्या बांधकाम परवानगीत फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अडकलेली आहे. आता हरित लवादाकडून परवानगी न घेतल्यामुळे हा प्रकल्प नगरकरांच्या जीवावर उठला की काय असा सवाल विचारला जातो आहे. या बिल्डिंग मार्फत तयार होणारा मैला थेट सारडा कॉलेज शेजारील असलेल्या नाल्यात सोडला जाईल आणि सिने पर्यंतचे पाणी प्रचंड प्रमाणात दूषित होईल. दुर्गंधी आणि घाणीचा त्रास नगरकरांना होईल. या धोक्यापासून मंडळाने नगरकरांना वाचवले आहे आणि या बिल्डिंगचे बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत.