नगर जिल्ह्यात अतिशय कमी प्रमाणात शिल्लक राहिलेले वडवृक्षचे प्रमाण वाढवण्याचे काम मेजर शिवाजी पठाडे यांनी केले.
बालाजी फाऊंडेशन देडगावं यांनी सुरू केली पर्यावरण चळवळ.
2017 पासून निसर्ग संवर्धनाचे काम सुरू आहे या माध्यमातून निसर्ग,आरोग्य, शेती सुधारणा, ग्रामीण भागामध्ये पर्यावरण पूरक अर्थक्रांती करणे, हा आपला उद्देश आहे. यासाठी आपण कार्यरत आहोत…
आत्तापर्यंत नगर जिल्ह्यातील 17 गावांमध्ये हजारो राष्ट्रीय वृक्ष ( वड ) लावले आहेत ज्यांची संख्या नगर जिल्ह्यात खूप कमी झाली होती त्याचबरोबर अनाथ आश्रम वडाळा या ठिकाणी ही आम्ही बहुमुल्य योगदान दिले आहे.
आपल्याला हे जीवन निसर्गाने बहाल केलें आहे… आज आपण जगत असताना पावलापावलावर हजारो माणसे आपल्यासाठी काहीतरी करत असतात, किव्वा अशी अनेक माणसे आज हयात नाहीत की ज्यांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवले आहे… आज आपली ही जबाबदारी आहे की ज्यांनी आपल्यासाठी काही केले आहे.. मग ते हयात असतील, किव्वा नसतील… त्यांच्यासाठी, समाजासाठी, निसर्गासाठी काहीतरी केले पाहिजे… यासाठी पर्यावरण पुरक चळवळ सुरू केली आहे.
त्यासाठी आपण सर्वांनी देडगावं, माका, पाचुंदा अशा तिन्ही गावचे दैवत पावनगणपती परिसरात 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता पावनगपती वडराई प्रोजेक्ट मध्ये एकत्र येऊन पर्यावरणाला वाचवण्यासाठी महाश्रमदान या उपक्रमात पावनगणपती मंदिर परिसर स्वच्छ करून नवीन वृक्षारोपण होणार असून झाडांना पाण्याच्या सोईसाठी बंधारा बांधण्यात येणार आहे. आपण सहभागी होऊन आम्हाला या कार्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य आणि मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती…
मेजर शिवाजी पठाडे
संस्थापक बालाजी फाऊंडेशन देडगावं
अध्यक्ष- जय हिंद वृक्ष बँक अ.नगर