नगरमध्ये पुरुषाचा हुंडाबळी : सासरच्या त्रासाला कंटाळून त्याने उचलले टोकाचे पाऊल, पहा बातमी सविस्तर.
सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून विवाहिता आत्महत्या करते, बऱ्याचदा हुंडाबळीच्या ही घटना घडतात. मुली झाल्या म्हणून देखील तिला त्रास दिला जातो, या सर्व घटना एका स्त्रीच्या बाबतीत घडत असतात मात्र एक धक्कादायक घटना समोर येत आहे.
सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून एका पुरुषाने आत्महत्या केली आहे. या सासरचे लोक या पुरुषाचा छळ करत होते. त्यामुळे या पुरुषांने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली. या धनेश कदम चव्हाण असा आत्महत्या केलेल्या या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धनेशचा सासरा, सासू, पत्नी आणि मेहुना यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तरी याप्रकरणी धनेश याची आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा धनेशचा विवाह कुकलाल काळे यांची मुलगी पूजा सोबत 24 ऑगस्ट 2021 रोजी झाला होता. विवाह करते वेळी धनेशच्या घरच्यांनी मुलगी पूजा यांच्या वडिलांना एक लाख रुपये देण्यास कबूल केल होत. लग्नाच्या दिवशी पन्नास हजार रुपये रक्कम दिली, बाकी रक्कम नंतर देण्याचे ठरले. उरलेली पन्नास हजार रुपयाची रक्कम देण्यासाठी धनेशच्या पत्नीसह सासरची मंडळी त्यांचा वेळोवेळी छळ करत होते.
या त्रासाला कंटाळून त्याने 1 ऑक्टोबर 2021 दिवशी विषारी पदार्थ सेवन केल, दरम्यान मयत धनेशच्या मृत्यूचा व्हीसेरा नाशिक येथील प्रयोगशाळेतून एका वर्षानंतर प्राप्त झाला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला.