विवाहित महिला गुगलवर ‘ हे ‘ सर्च करतात.
पहिल्या काळामध्ये अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक स्वरूपाच्या गरजा होत्या, पण आज जर आपण विचार केला तर त्यामध्ये आणखी एक गोष्ट समाविष्ट झाली आहे ती म्हणजे इंटरनेट तसेच गुगल. अन्न वस्त्र निवारा याचप्रमाणे आजच्या काळामध्ये गुगल किंवा गुगल सर्च करणे हे खूप महत्त्वाचं ठरलं आहे. आणि गुगल सर्च मुळे आपण जगाशी संबंधित सगळ्या प्रकारची माहिती मिळू शकतो.
गुगल मुळे आपण आपले मित्र परिवार, नातेवाईक यांच्याशी अप्रत्यक्षपणे जोडले गेलो. गुगल सारख्या इंजिन ने आपल्याला विविध पर्याय उपलब्ध करून दिली, त्यामध्ये थोडक्यात सांगायची झाले जर एखाद्या बद्दलची माहिती घ्यायची असेल तर आपण गुगल सर्च इंजिन वापरतो. गुगल सर्च इंजिन वर उठण्यापासून तर झोपणे पर्यंत दैनंदिन वापरा मधील सर्व गोष्टी भेटतात. आपण गुगल सर्च इंजिन वर ऑनलाईन खरेदी, त्याचप्रमाणे बँकिंग व्यवहार, मनोरंजन, माहिती तंत्रज्ञान विविध प्रकारच्या माहिती मिळू शकतो. पण आपला आजचा विषय आहे तो म्हणजे ज्या विवाहित महिला आहेत त्या गुगल सर्च इंजिन वापरून नेमकं कशाचा शोध जास्त प्रमाणात शोध घेतात.
नवभारत टाइम्स च्या वृत्तानुसार, विवाहित महिला गुगलवर जास्त काय सर्च करतात ? याविषयी एक रिपोर्ट काढण्यात आला आणि त्यामध्ये असे निदर्शनास आले की, विवाहित महिला गुगलच्या माध्यमातून आपल्या पतीची माहिती घेण्याचा सर्वाधिक जास्त प्रयत्न करत असतात. आपल्या नवऱ्याला सगळ्यात जास्त आनंदी कसं ठेवायचं ? हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि विवाहित महिलांचा सर्वात आवडता विषय देखील आहे. आणि यामध्ये आश्चर्याची बाब अशी की, विवाहित महिलांना गुगलवरही केवळ आपल्या पति बाबतीतच जाणून घ्यायचं असतं.
त्याचप्रमाणे एका अहवाला मधून असंही पुढं आलं की, पतीला आनंदी कसं ठेवायचं या प्रश्नाव्यतिरिक्त काही महिला इतर प्रश्न देखील सर्च करत असतात. त्यामध्ये दुसरा विषय आपण म्हणूया तो म्हणजे विवाहित महिला आपल्या पतीला ताब्यात कसं ठेवायचं ? त्याचप्रमाणे सासरकडच्या मंडळीसोबत कसं वागायचं ? याबाबत देखील सर्च केलं जातं. आपल्या पतीसोबत चांगले संबंध कसे टिकून राहतील ? याबाबत देखील सर्च केलं जातं. त्याचप्रमाणे आता महिला या स्वावलंबी होत आहेत अशा परिस्थितीमध्ये त्या गुगलवर किंवा त्यांच्यासाठी करण्यासारखे आहे त्या गोष्टींचा शोध घेत असतात. स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येईल ? सुरु केलेला स्वतःचा व्यवसाय जास्त लोकांपर्यंत कसा नेता येईल ? अशा विविध प्रकारचे प्रश्न महिला गुगल सर्च इंजिन वर शोधत असतात. यामध्ये विवाहानंतर मूल जन्माला घालण्यासाठी योग्य वेळ कोणती ? याबाबतचे प्रश्न देखील अनेक महिला गुगल सर्च इंजिन वर सोडत असतात.