आय.एम.एस ( IMS )च्या आयटी विभागाच्या एम.सी.ए. च्या विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये या वर्षीही घवघवीत यश.
शिक्षण झाल्यानंतर त्या डिग्रीमध्ये मास्टर करून चांगला ठिकाणी नोकरीला लागायचे हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं आणि त्यासाठीच त्याची शिक्षण घेण्यासाठी धडपड चालू असते. व याच शिक्षणाच्या जोरावर नोकरी करून आपले भविष्य उज्वल करत असतो. अहमदनगरच्या अशाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे आणि चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये यश मिळवला आहे.
एम. सी. ए. च्या २०१९ मधील २२ विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये या वर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मुलाखतीच्या द्वारा निवडीच्या संधी दिल्या. १८ विविध कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. स्वप्नाली काळे, मयूर गव्हाणे व अपुर्वा देवळालकर यांना सर्वाधिक पॅकेज मिळाले आहे.
अपुर्वा देवळालकर(आरहील, पुणे), स्वप्नाली काळे(होनुर, पुणे), राधिका देवी (बन नेटवर्क, पुणे), नितिन घाडगे (सिलेरिटीओ, पुणे), सुम्मय्या शेख (सोल्युशन लाईन्स, पुणे), पल्लवी जाधव (वाई टेकनॉलॉजी), आहे
(ईएमडीईपी पुणे), आणि दुस स्कैनर, मुंबई), प्रतीक्षा वेदीकर ( टेस्टींग पुणे), सदीप नाकाडे (केके टीम), तृप्ती निभोरे (दादा पाटील कॉलेज) या विद्याथ्र्यांची निवड झाली आहे. प्लेसमेंट समन्वयक डॉ. अंजली वैद्य, प्रा. गौरी पाटील व सर्व विषय प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य व तंत्रज्ञान कौश्यल्य यांच्या जोरावर या संधी मिळविल्या. या निवडीबद्दल विभाग प्रमुख, डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर व बी. पी. येच ई. सर्व संस्था प्रमुख यानी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले
त्यांनी केलेला अभ्यास त्यामुळे त्यांच्या चिकाटीमुळे आणि जिद्दीमुळे त्यांना हे यश संपादन झालेला आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज मालेतील त्यांना खूप खूप शुभेच्छा