कामाच्या गोष्टी

चमत्कार ! 45 मिनिटं नॉनस्टॉप CPR आणि शॉक; डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी रुग्णाला मिळाले जीवदान.

जालन्यात वैद्यकीय क्षेत्रात एक चमत्कार घडला, डॉक्टरांनी एका गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. एका तरुणाचा जीवं वाचवला . नवरात्रीच्या गरबा खेळत असताना, या तरुणावरती मृत्यूने वक्रदृष्टी पडली होती. पण मात्र असं म्हटलं जातं की डॉक्टर हेच देवाचे रूप आहे डॉक्टरांनी या तरुणांचे प्राण वाचवले,नवरात्रोत्सवात दांडिया खेळत असताना मैदानावर कोसळलेल्या २२ वर्षीय तरुणाला डॉक्टरांनी जीवदान दिलं आहे. डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास अखंड सीपीआर देत, डीसी शॉक देत तरुणाचा जीव वाचवला. यामुळे तरुणाला जीवदान मिळालं.

जेमतेम २२ वर्षांचा गौरव प्रमोद रत्नपारखे हा तरुण नवरात्रोत्सवात दांडिया खेळत असताना अचानक मैदानावर कोसळला. तिथे हजर असलेल्या मित्रांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये तातडीने भरती केलं. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी गौरवला तपासले. त्याचे हृदय आणि श्वसनक्रिया बंद पडलेली होती. गौरवचे डोळेसुद्धा बॅटरीच्या उजेडाला प्रतिसाद देत नव्हते. अशावेळी रुग्णाला मृत घोषित करणं अथवा पुढे रेफर करणं हाच पर्याय असताना क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांनी त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली.

१५ मि सीपीआर दिल्यानंतर आणि गौरवच्या हृदयाची हालचाल सुरू झाली. पण दुर्दैवाने ती व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन या प्रकारची होती. ती जगण्याच्यादृष्टीने निरुपयोगी होती. त्यामुळे त्याला डीसी शॉक दिला तरीही हृदयाचे ठोके काही हवे तसे सुरू झाले नव्हते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत, डॉक्टरांनी हार न मानता त्याला सीपीआर चालूच ठेवला. सोबतच ऍट्रॉपीन आणि ऍड्रेनालाईनचे शॉट्स आणि त्या दरम्यान डीसी शॉकसुद्धा देण्यात येत होते.

जवळपास ६ डीसी शॉक, ४५ मिनिटांचा अखंडित सीपीआर आणि कित्येक ऍट्रॉपीन आणि ऍड्रेनालाईनचे शॉट्स या सर्वांचं फलित म्हणजे गौरवचं हृदय पुन्हा हवं तसं सुरू झालं. इथपर्यंतची लढाई डॉक्टरांनी जिंकली तरी खरी लढाई अजून बाकी होतीच. जवळपास एक तास हृदयाचे ठोके बंद होते अशावेळी संपूर्ण शरीरात खूप गंभीर स्वरूपाची गुंतागुंत होत असते. सगळ्यात मोठा धोका म्हणजे जवळपास एक तास मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे रुग्णाला आयुष्यभरासाठी न्युरोलॉजीकल कमतरता किंवा कोमामध्ये राहण्याची शक्यता असते.

डॉक्टरांनी कौशल्यपूर्वक व अखंडित सीपीआर दिल्यामुळे गौरवच्या मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होत राहिला व त्यामुळे कुठलही अपंगत्व न येता तो तिसऱ्या दिवशी स्वतःच्या पायावर उभा राहिला. एवढा वेळ CPR दिल्यानंतरही त्याची एकही बरगडी फ्रॅक्चर झाली नाही हे डॉक्टरी पेशाचे कसब महत्त्वाचे ठरले.

जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे गौरवला आयुष्याची नवसंजीवनी मिळाली. डॉक्टरांना देवदूत मानलं जातं. संजीवनीचे डॉक्टर गौरवसाठी अक्षरश: देवदूत ठरले. आज गौरवला डिस्चार्ज मिळाला. तेव्हा त्याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू होतं.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!