मा.श्री. तुकाराम हनुमंत गेरंगे यांची राष्ट्रीय मानव अधिकार संघटना मध्ये अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती.
राष्ट्रीय मानव अधिकार संघटना
मा.श्री. तुकाराम हनुमंत गेरंगे यांची राष्ट्रीय मानव अधिकार संघटना मध्ये अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तरी सदरची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. गणेश रंगराव डवरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली व राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार माजी न्यायमूर्ती *डॉ.विजय पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास सावर्डेकर, राष्ट्रीय संघटक ऋषीकेश भोईटे, राष्ट्रीय महिला सचिव आशा पाटील, राष्ट्रीय मार्गदर्शक दिलीप फडोळ – पाटील व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नारायण घोरमारे तसेच महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौ. कविता बोडखे व महाराष्ट्र राज्य प्रमुख उपाध्यक्ष डॉ. विक्रांत देशमुख तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष देवेंद्र बोडखे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे तरी नव निर्वाचित अहमदनगर जिल्हा अध्यक्ष तुकाराम हनुमंत गेरंगे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा💐🙏🏻
” आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेश रंगराव डवरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माझी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदावरती नियुक्ती करण्यात आली गेले दहा वर्षापासून सामाजिक राजकीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मी समाजकार्य करत आहे.
समाजात काम करत असताना बऱ्याच गरजू व्यक्तींना शक्य तितक्या प्रमाणात न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. संघटनेने दिलेली जबाबदारी व टाकलेला विश्वास याच्यावर आगामी काळात अहमदनगर जिल्ह्यामध्ये संघटन वाढीसाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कायम कटिबद्ध राहू. तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार मानतो. “
राम कृष्ण हरी.
आपलाच,
श्री तुकाराम हनुमंत गेरंगे पाटील (महाराज)
सामाजिक कार्यकर्ते