” ना मिलो हमसे ज्यादा कही ….” चक्क 18 वर्षाची मुलगी वयाने ‘एवढा’ फरक असलेल्या पुरुष्याच्या प्रेमात पडली.
प्रेमाला वय नसते असं म्हटलं जातं. प्रेम कोणत्याही वयात कोणावरती होतं. असे अनेक किस्से तुम्ही पाहिले असतील. पण ‘ना मिलो हमसे ज्यादा असं म्हणत एका 18 वर्षीय तरुणी 55 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली. प्रेमात पडलं की काय योग्य काय अयोग्य याचा काही मेळ लागत नाही आणि त्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात. त्या व्यक्ती शिवाय दुसरा कोणताच विचार मनात येत नाही, आपल्या प्रियकरासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात अनेकदा प्रेमात आणाभाका घेऊन जीव देण्याचे प्रयत्नही केले जातात.
अशीच एक प्रेम कहाणी आहे ही प्रेम कहानी एका शहरातून समोर येत आहे. एक १८ वर्षाची मुलगी 55 वर्षाच्या व्यक्तीच्या प्रेमात वेडी खुळी झाली, 55 वर्षीय फारुख यांच्या ती प्रेमात पडली. तर दोघेही कायमचे एकमेकाचे झाले. मुस्कान च्या गाण्यांनी प्रभावी झाल्यानंतर तो तिच्याजवळ गेला. फारुखच्या बोलण्याच्या स्टाईलने ती त्याच्यावर फिदा झाली. मुस्कान त्यांच्या घराजवळ राहायची त्याला तिच्या गाण्याची आवड होती . अशा परिस्थितीमध्ये घरी येणं जाणं वाढलं. हळूहळू त्यांच्या मनात प्रेमाच्या भावना निर्माण झाला ते दोघे एकमेकांशी बोलू लागले.
मुस्कान प्रेमात पडली, मग तीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. दोन्ही रिलेशन मध्ये येण्याचा विचार करू लागले. तर कुटुंबातील सदस्यांनी मित्र मंडळींनी विरोध केला. मात्र कुणाचीही पर्वा न करता हे दोघाजणांनी एकमेका वरती प्रेम केलं,
फारूखच पहिले लग्न झालेला आहे. पण त्यातून ते आतापर्यंत सिंगल होते पण वयाच्या 55 व्या वर्षी त्यांना वधू मिळालेली म्हणून खूप खुश आहेत. ते दोघे लग्न करणार आहेत. समाजाच्या सर्व मर्यादा पार करून मुस्कान आणि फारूक यांची ही प्रेम कहाणी आहे. त्यामुळे नेटकरी या प्रेम कहाणीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. अनेकजण याबद्दल आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत पती आणि पत्नीमध्ये वयाचं अंतर असणारे अनेक कपल तुम्ही पाहिले असतील, मात्र वयात अत्यंत मोठी दरार असूनही दोघांचं प्रेम झालेला आहे आणि लग्न करणार आहेत असे प्रकार क्वचितच पाहायला मिळतात.