नगर ब्रेकिंग : वाहतूक शाखेचा निष्क्रिय कारभार, महापालिकेच्या कचरा गाडीने घेतला एकाचा बळी.
आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे अहमदनगर शहरातील सुरु असलेल्या उड्डाणपुलाखाली सक्कर चौकातील घटना….
अहमदनगर मध्ये महत्वकांक्षा असणारा उड्डाणपुलाचे काम सुरू आहे मात्र या उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी आणि अनेकांचे जीव जाण्याच्या घटना घडत आहेत.उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक अन्य ठिकाणी वळवण्यात आलेली आहे, सक्कर चौक या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सदर वाहतूक ही विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या समोरून वळविण्यात आली आहे त्यामुळे अनेकदा काही अपघात होत असतात.
यातच एक घटना घडली आहे वाहतुकीचे नियोजन नसल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला दुचाकी वरून हा व्यक्ती जात असताना मनपाच्या कचरा गाडीने त्याला धडक दिली व अपघात झाला महानगरपालिकेच्या वतीने दिवसभर घंटागाडी फिरत असते आणि हीच घंटागाडी एका व्यक्तीसाठी शेवटची घंटा वाजवून गेली.
अपघात झालेल्या सदर व्यक्तीचे नाव अशोक शिंदे वय 40 असून सदरचा व्यक्ती हा वाळुंज येथील रहिवाशी आहे. या ठिकाणी वाहतुकीचे कोणतेही व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे हा अपघात झाला आहे असा आरोप परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे वाहतूक शाखेचा निष्क्रिय कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सदरील व्यक्ती हा होमगार्ड असल्याची माहिती समोर आली आहे.