नगर ब्रेकिंग – शहरात ” या ” नामांकित कंपनीची बनावट चहा पावडर जप्त, पहा बातमी सविस्तर.
आपल्या दिवसाची सुरुवात ज्याने होते ते म्हणजे चहा आणि हा चहा भेसळ युक्त असेल तर याचे शरीराला मोठे परिणाम सहन करावे लागतात. अनेक गोष्टी महागले आहेत आणि यातच भेसळ युक्त वस्तू आपल्याला घरी आणावे लागत असतील तर या कुठेतरी थांबले पाहिजे. तर चहा पावडर मध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एका व्यापाऱ्याला पकडला. सकाळची सुरवात करणाऱ्या चहामध्ये च जर भेसळ असेल, ती जशी बनावट असेल तर आपल्या शरीरावर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात त्यामुळे ही कारवाई प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि पुढील कारवाई केली नेमकी कुठल्या ठिकाणी ही घटना घडली आहे पाहूयात बातमी सविस्तर..
आपण जो दररोज सकाळी चहा पितो, या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे . या तुमच्या चहामध्ये भेसळ तर नाही ना? जर भेसळ असेल तर ती थांबली जाईल ,कारण शहरातील या ठिकाणच्या व्यापारी पेठेत एक मोठी कारवाई करण्यात आली. यात बनावट चहाचे पाऊच जप्त करण्यात आले. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी दुकानदार मालक सागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सपाट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे विक्री व्यवस्थापक अजय मोरे यांनी हि फिर्याद दिली.
कंपनीचे नाव साम्य आणि कंपनीचे नावाचा लोगो वापरून बनावट चहाची विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्याच माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली, साम्य असणारा बनावट चहा विकणाऱ्या दुकानदारांवरती शहर पोलिस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्यासह पथकाने संयुक्त छापा टाकला ही कारवाई अहमदनगर शहरातील डाळ मंडई व्यापारी पेठेत झाली आहे. त्यामुळे आपला चहा भेसळयुक्त किंवा बनावट दर्जाचा तर नाही ना हे एकदा तपासून पाहणे गरजेचे आहे.