नगर ब्रेकिंग : नगरकरांसाठी खुशखबर ! रस्त्याच्या कामासाठी तब्बल एवढा रुपयांचा निधी मंजूर.
नगर शहर हे खड्ड्यांच्या बाबतीत जास्त प्रमाणात ओळखलं जातं. नगर मधील खड्ड्यांचा विषय कायमच ऐरणीवर असतो. विकासाचा बाबतीत नगर कायमच पिछाडीवर राहिले आहे. ऐतिहासिक वारसा असणारे हे नगर शहर असून देखील येथे विशेष अश्या सोयी सुविधा नाहीत. त्यातच एक म्हणजे नगरचे रस्ते !!
नगर मनमाडचे काम काही दिवसापासून चालू असतानाच मध्येच या कामाचा जो कंत्राटदार होता त्याने हे काम अर्धवट सोडून दिले आणि त्यानंतर या नगर मनमाड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आणि त्यामुळे अनेक दिवसांपासून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मग आता या सगळ्याची जबाबदारी किंवा या रस्त्याचे काम पुढे होणार की नाही होणार असं सर्वसामान्यांमध्ये चर्चा होत होती.
यातच नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केंद्राकडे पाठपुरवठा करून या नगर मनमाड रोडवरील किमान खड्डे दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. या निधीमधून किमान रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे तात्पुरता का होईना खड्ड्यांपासून दिलासा मिळणार आहे. तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
आधी होत असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अर्धवट राहिले आहे. आणि तो कंत्राटदार अर्धवट काम सोडून निघून गेला आहे. त्यामुळे आता जुनी निविदा रद्द करून नवीन काढण्यासाठी व त्यासोबतच पुन्हा काम चालू होण्यासाठी मोठा अवधी लागू शकतो. म्हणून अशा काळात या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी खासदार विखे यांनी हा निधी मंजूर करून आणला आहे.
येत्या आठ दिवसांमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू होणार आहे व सदरील आधीच्या रुंदीकरणाचे काम देखील तीन महिन्यांमध्ये नवीन कंत्राटदारा मार्फत पुढे सुरू होणार आहे अशी माहिती डॉक्टर विखे पाटील यांनी दिली आहे या बातमीने नगरकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे.