नगर ब्रेकिंग : नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील एवढेजण जागीच ठार.
Terrible accident on Pune-Ahmadnagar highway, 5 people were killed on the spot in a collision with a truck

अत्यंत दुःखद बातमी सातत्याने अपघातांचे प्रमाण वाढले, यातच माजी आमदार विनायक मेटे यांचाही मृत्यू अपघातामध्ये झाला. असाच एक भीषण अपघात पुन्हा एकदा झाला. पुणे- अहमदनगर महामार्गावर ती सतत अपघात होत असतात. अपघातांची मालिका सुरुच असते अत्यंत भयानक होतात. यामध्ये अनेक वेळा काहींचा जीवही गेला.
पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघात बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला, चुकीच्या दिशेने प्रवास करत असलेल्या ट्रक अचानक कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या कारमध्ये तीन लहान मुल होते. त्याचबरोबर कुटुंबीय होते. रांजणगाव MIDCकंपनी समोर हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये अक्षरशः पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
संजय मस्के वय वर्ष 53, राम मस्के वय वर्षे 45 ,त्याबरोबर सात वर्षांचा एक मुलगा, हर्षदा चार वर्षाचे ,विशाल सोळा वर्षाचा आणि साधना मस्के हे सर्व राहणार पनवेल यांचा अपघातात झाला. कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची बातमी फक्त साधना मस्के या गंभीर जखमी आहेत. तर तीन मुलांसह इथे दोन पुरुष यांचा मृत्यू झाला. कार मधील सर्व प्रवासी हे पनवेल ला जात होते अशी प्राथमिक माहिती मिळते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली, वाहन हटवण्यात आली या अपघातात मात्र अचानक एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यानं शोककळा पसरली यातील चे सर्व जखमी आणि मृत्युमुखी पडलेली आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव येथील मूळचे रहिवासी असलेली माहिती मिळते या घटने मुळे या गावावर शोककळा पसरली आहे.