नगर ब्रेकिंग : , स्टेरॉईड मिळाले नाही म्हणून तरुणाने स्वतःला गाडीत जाळून घेतले. पहा व्हिडिओ.

नगर औरंगाबाद रोड वरील नेवासा तालुक्यात चिंचोरा शिवारात एक धक्कादायक प्रकार घडला.
एका गाडीला भीषण आग लागली होती स्थानिकांनी या गाडी जवळ जाऊन पाहिले असता त्यामध्ये एक व्यक्ती जळत होती. त्या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे कि, स्टेरॉईड नावाचं ड्रग्स मिळाल नाही म्हणून लंकेश चितळकर या तरुणानं आत्महत्या केली. त्याने स्वतःला- स्वतःच्याच गाडीत पेटवून घेतल आहे. या गाडीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती.
स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन चे अधिकारी त्या ठिकाणी आले, या आगीमध्ये लंकेश 80 ते 90 टक्के जळाला होता. त्यामुळे त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तो मयत झाला होता.
ड्रग्सला बंदी असूनही लंकेशला ते कुठे उपलब्ध झाले, त्याला याचे व्यसन कसं लागलं ? आणि या घटनेमागे ड्रग्स हेच कारण आहे का ? कि याच कारण अन्य काही आहे यावरती आता पोलीस शोध घेऊन योग्य ती कारवाई करतील. मात्र नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच असा धक्कादायक प्रकार घडला आहे. लंकेश चितळकर हा तरुण शहरातील पवननगर येथील रहिवाशी आहे.