नगर ब्रेकिंग : नगर औरंगाबाद रस्त्यावर स्वतःला पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.
काल ( दि २८ जुलै २०२२ ) नगर औरंगाबाद महामार्गावरील नेवासा या ठिकाणी नगर मधील एका युवकाने ( लंकेश चितळकर ) स्वतःच्या गाडीत स्वतः ला पेटवून घेतल्याची घटना घडली होती.
हि घटना घडल्यानंतर त्या तरुणाला पुणे येथे पाठवण्यात आले होते. पण तो युवक उपचारादरम्यान 80 टक्के भाजल्याने लंकेत चितळकर या युवकाचा अखेर मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.
सदरील युवक लंकेश चितळकर हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता, अशी माहिती समोर आली आहे.
दुर्दैवी मृत्यू झालेला चितळकर अहमदनगर शहरातील पवननगर भागातील रहिवासी होता. तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी होता अशी देखील माहिती समोर येतेय मात्र स्वतःच्याच गाडीमध्ये स्वताला का पेटवून घेतलं याबद्दल कुठलीही स्पष्टता समोर आलेले नाहीये. याचा तपास सुरू आहे मात्र तो 80 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चितळकर या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.