नगर : सावकाराच्या कर्जाला कंटाळून शिवराम वडेवाले च्या मालकाने उचलले हे टोकाचे पाऊल.
असं म्हटलं जातं की कधीही सावकाराकडून कर्ज काढायचं नाही, ज्यांनी सावकाराकडून कर्ज काढले ते पूर्ण बरबाद झाले अशीच एक घटना श्रीगोंदा येथे घडली आहे.
श्रीगोंदा येथील शिवराम वडेवाले चे मालक शिवराम वहाडणे यांनी खाजगी सावकारांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी 15 सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये नऊ जणांना अटक केली असून यामधील आणखी सहा जण फरार आहेत.
शिवराज यांनी काही खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या अव्वाच्या सव्वा पैसे उकळून त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय. शिवराम वडेवाले चे मालक यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समजले याबाबत त्यांच्या पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.
शिवराम यांच्या वहीमध्ये सावकारांनी दरमहा १० ते 40 टक्क्यापर्यंत व्याजाने 10 लाख रुपये दिल्याची नोंदणी आढळल्या. आणि त्यानुसारच पोलिसांनी वहाडणे यांच्या वह्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे एका सावकाराने तर २०००० रुपयांच्या कर्जावर दररोज 700 रुपये व्याज उकळण्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी घटनेचा गांभीर्य ओळखून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मयताच्या पत्नी यांच्या फिर्यादीवरून काही खाजगी सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपासणी पोलीस अधिकारी करत असून काही जणांना तातडीने अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून इतर आरोपींचा देखील शोध घेतला जात आहे.
यामध्ये आपण जर एखाद्या खाजगी सावकाराकडून कर्ज घेत असाल, तर बऱ्याच गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचे आहे. खाजगी सावकार हे सामान्य लोकांची लुट करत असतात, पैसे उकळत असतात. आणि अशा वेळेस सावकाराच्या कर्जाला कंटाळून अनेक जणांनी आत्महत्या केलेल्या बातम्या आपण या आधी देखील ऐकल्या असतील.