नगर वार्ता : पैशासाठी विवाहितेचा छळ, पैशासाठी केला होता जाळण्याचा प्रयत्न.
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील घटना,आदिवासी कुटुंबातील विवाहितेची सासरच्या मंडळींकडून छळ
विवाहितेची पोलिस अधीक्षकांकडे धाव, सासरच्या मंडळींवर कायदेशीर कारवाई करा.
आपण विवाहितेला सासरकडील लोक छळ होत असलेल्या बातम्या बऱ्याच वेळेस पाहिल्या व ऐकले आहेत अशीच एक घटना श्रीगोंदा येथील पिंपळगाव पिसा या ठिकाणी घडलेली आहे सदरील विवाहितेची सासरकडच्या मंडळींनी छळ केला आहे प्रत्येक वेळेस बाहेरून पैसे आणावेत म्हणून त्या विवाहितेचा छळ केला गेला आणि त्या झाडाला वैतागून अखेर ही विवाहिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तिला अन्याय मिळावा म्हणून निवेदन करते याबाबतची सविस्तर बातमी पाहू
या बातमीमधील विवाहित हि श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा या ठिकाणची रहिवासी आहे. सदरील महिलेचे नाव आक्की नवनाथ भोसले हे असून, तिला सासरच्या मंडळी कडून शारीरिक मानसिक व आर्थिक पिळवणूक केली जात होती, त्याचप्रमाणे तिला अनेक वेळेस जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला होता, याबाबत सदर मागणीचे निवेदन तिने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.
ती निवेदन देताना म्हणते की, ” मी आदिवासी पारधी समाजाची आहे. माझे माहेर हे श्रीगोंद्यातील बेलवंडी या ठिकाणचे असून माझ्या वडिलांचा शेती, शेळीपालन व दुग्ध व्यवसाय आहे. माझे लग्न दहा ते पंधरा वर्षांपूर्वी निळोबा भोसले यांच्या मुलासोबत ( नवनाथ भोसले ) करण्यात आले आहे. मी माझ्या माहेरहून पैसे आणून द्यावेत यासाठी नवरा व सासरचे मंडळी यांनी मला वारंवार त्रास दिला आहे. माझ्या वडिलांनी याआधी पाच लाख रुपये दिले होते. त्यानंतर नवऱ्याला युनिकॉर्न गाडी, एक ट्रॅक्टर दिला एवढे देऊनही माझा त्रास थांबला नव्हता.
काही दिवसापूर्वी माझ्या सासरवाडीतील लोकांनी माझ्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून मला जाळण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्याचप्रमाणे या महिलेने सासू, सासरे, नवरा, ननंद यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे. या सर्व आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व मला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी या विवाहित महिलेने व तिचा भाऊ भगवान चव्हाण यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.