नगर वार्ता : नेवासाच्या भूमाता फूड प्रोडक्टचा दिल्लीत डंका.

पंतप्रधान यांनी घेतली युवा उद्योजक गणेश शिंदे यांच्या कार्याची दखल !!
दिल्लीतील विज्ञानभावनामध्ये उद्यमी भारत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे तसेच राज्यमंत्री भानू प्रताप सिंह वर्मा यांच्यासह अन्य मान्यवर मंडळ उपस्थित होते.
एकविसाव्या शतकातील भारत प्रगतीच्या शिखरावरती पोहोचला आहे. यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सूक्ष्म, लघु मध्यम उद्योगा अंतर्गत ग्रामीण भागातील उद्योग धारकांची संख्या अधिक आहे आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, प्रथमच खादी आणि ग्रामोद्योग पंचवार्षिकमध्ये एक लाख कोटीहून अधिक आर्थिक उलाढाल झाली अस म्हणत समाधान व्यक्त केल. देशातील युवकांनी व्यवसाय क्षेत्रात उतरत देश प्रगतीपथावर घेण्यासाठी सहकार्य करावे आणि स्वावलंबी व्हावं असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची सन १९६२ मध्ये स्थापना झाली. ग्रामीण भागातील कारागीरांना रोजगार मिळवून देणं हे या मंडळाचे प्रथम उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागातील अनेक युवक विविध योजनांचा लाभ घेत आपला उद्योग करत असतात. यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना या अंतर्गत लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात आपण आपला व्यवसाय उभा करू शकतो. अशाच योजनेचा लाभ घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खरवंडी इथले सुपुत्र गणेश सुनील शिंदे यांनी उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून देशातील 22 उद्योजकांपैकी पहिल्या तीन मध्ये त्यांची निवड झाली. महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान देखील त्यांना मिळाला.
खादी ग्रामोद्योग अहमदनगर यांच्यामार्फत उद्यामी भारत या कार्यक्रमांमध्ये गणेश शिंदे यांना प्रवेशाकरिता संपूर्ण प्रक्रिया पार पाडली, त्यानंतर अनेक स्पर्धात्मक परीक्षा नंतर गणेश शिंदे यांची निवड उद्योग भारत या कार्यक्रमासाठी झाली. त्यांच्या समवेत खादी व ग्राम उद्योग नोडल अधिकारी श्री बाळासाहेब मुंडे यांची ही निवड झाली. त्यानंतर 30 जुलैला नवी दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी उद्यामी भारत या कार्यक्रमासाठी उपस्थितीत झाले. उद्यामी भारत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खुद्द पंतप्रधान यांनी त्यांच्याशी बातचीत केली. त्यांच्या भूमाता फूड प्रॉडक्ट या व्यवसायाबद्दल पंतप्रधान यांनी माहिती जाणून घेतली. व्यवसायात येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठी काही उपाय योजना आणि पुढील काळात लागणारी मदत याबद्दलही विशेष चर्चा झाली.

युवा उद्योजक गणेश शिंदे यांच्या फॅक्टरीमध्ये नाचणी सत्व जे लहान मुलांचा आहार म्हणून वापरले जातात, त्याचबरोबर नाचणीचे बिस्किट जे सर्व वयोगटातील लोकांसाठी वापरले जाऊ शकतात, त्याचबरोबर गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी शतावरी युक्त नाचणी बिस्कीट तसेच शतावरी युक्त फूड सप्लीमेंट गरोदर मातांना, स्तनदा मातांसाठी उपयुक्त असा आहार, पौष्टिक प्रोटीन पावडर तसेच पौष्टिक बिस्किट, नैसर्गिक स्रोत असलेले फूड सप्लीमेंट कुपोषण निर्मूलनासाठी उपयोगी लहान बालक आणि गरोदर मात्र यांच्यासाठी उपयुक्त जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी असे अनेक नैसर्गीक उत्पादने भूमाता फूड प्रॉडक्ट इंडस्ट्री तयार करते. जिल्हा परिषदेचे अंतर्गत, पंचायत समितीचे अंतर्गत आणि गाव खेड्यांमध्ये कुपोषण निर्मिती कुपोषण निर्मूलनासाठी या उत्पादनांचा वापर केला जातो यामध्ये गणेश शिंदे यांच्या भूमाता फूड प्रॉडक्टचे महत्त्वाचे योगदान आहे.
त्यांच्या या यशस्वी वाटचाली मुळेच उद्यामी भारत या कार्यक्रमात त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली खादी व ग्राम उद्योग यांनी केलेल्या सहकार्यातून उत्कृष्ट उद्योजक म्हणून गणेश शिंदे यांची वाटचाल नवी दिल्लीत पोहचली म्हणून जिल्हा उद्योग केंद्र नगर येथे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.