नगर वार्ता ! पारनेर तालुक्यातील ह्या मुलांनी कधी शाळाच पहिली नाही…

शिक्षण हे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं सर्व शिक्षण अभियान हे आपल्या देशात सुरू आहे. मोठ्या मुलांसाठी कमवा आणि शिका अशाही योजना असतात. शिक्षणाने माणूस प्रगत होतो, शिक्षणाने माणसाची प्रगती होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण ही मूलभूत गरज आहे. “शाळा आमची आहे किती छान, आम्ही रोज शाळेला जाणार पण जर कधी शाळाच पहिली नसेल तर कसं बर शाळेला जाणार….?
ही बातमी आहे पारनेर तालुक्यातील. पारनेर येथील सुपे येथे वाळवणे रस्ता बस स्थानक औद्योगिक वसाहती आहे. या परिसरात मोल मजुरी करून पालात राहणाऱ्या लोकांच्या मुलांची स्थिती बिकट आहे. शालाबाह्य विद्यार्थी शोधण्याचे आदेश शिक्षकांना आले त्यानुसार शोध मोहीम सुरू झाली. पालात राहणाऱ्या मुलांची चौकशी केली असता अनेक मुले शाळाबाह्य आढळले. वस्तीत सुमारे शंभरहून अधिक शाळाबाह्य मुले आहेत. त्यांनी कधी शाळाच पाहिली नाही. त्यांच्या जीवनातील शैक्षणिक अंधार कधी संपणार ? शिक्षणाची पहाट कधी उगवणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून ६ ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण केले. या योजनेत एकही विद्यार्थी शाळेबाह्य राहणार नाही याची देखील आयोजन करण्यात आला आहे. असे आदेश शिक्षण विभागाकडून वेळोवेळी काढले जातात. या विभागाअंतर्गत शाळा व या मुलांचा शोध घेतला जातो. अनेकदा हा शोध फक्त कागदपत्रे असतो प्रत्यक्षात मात्र कुणीही त्या ठिकाणी येऊन शाळाबाह्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत न शिकणारी मुलं हे शोधून काढण्याचं काम आता शिक्षकांना देण्यात आला होता. एकच गावात शंभरहून अधिक मुले ही शाळाबाह्य असतील तर राज्यात संख्या किती असेल याचा विचार न केलेला बरा !!
औद्योगिक क्षेत्रात सुपे हे अत्यंत आदरणीय असं शहर आहे गाव आहे. औद्योगिक वसाहतीपासून अगदी काही अंतरावरती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. तसेच या गावात परिसरात जिल्हा परिषदेचे अनेक शाळा आहेत. माध्यमिक विद्यालय, खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. असं असताना देखील मोठ्या प्रमाणात मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. तर शिक्षण विभाग काय करतो असा प्रश्न उपस्थित राहतोय. या मुलांना न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका प्रतिभा फलके, सुवर्णा पाडेकर, संजय बर्डे हे शाळेत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या मुलांना शाळा शिकण्याची इच्छा असूनही अद्यापही या मुलांनी शाळा कधी पहिली नाही. या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित राहतोय.
दरवर्षी शाळाबाह्य मुले शोधण्याचे उपक्रम राबवला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पालात राहणाऱ्या मुलांकडे मात्र शिक्षण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले पालात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले. मात्र मुलांना शाळेची गोडी लागत नाहीये. त्यासाठी एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला. आणि वर्षानुवर्ष दारिद्र्याच्या खाईत असलेली ही मुलं, समाज या मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश पाडण्यासाठी तसेच बाहेर काढण्यासाठी एखाद्या माध्यमिक संस्थेने पुढाकार घेण्याचे मत व्यक्त केले जाते.