गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या प्रशासनामुळे नाहक १० वर्षाचा मुलाचा बळी.
सरकारला नावं ठेवली जातात, मात्र घटनाही अशाच घडतात. ही बातमी वाचून संभाजी नगर मधून अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येतेय. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसामुळे ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते रस्ते चिखलमय होतात. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं, रस्त्यांवर चालणे मुश्किल होत. दहा वर्षाच्या लहान मुलाचा अशाच रस्त्याने बळी घेतला आहे. रस्त्याने आणि गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारच्या व्यवस्थापनमुळे एका निष्पाप मुलाचा बळी घेतला.
ग्रामीण भागात रस्त्याच्या नावाखाली सगळा चिखल झाला आहे. लाडाकोडात वाढलेल्या मुलाच्या मृत्यूनंतर ही आई हंबरडा फोडते. या अवघ्या दहा वर्षाचा तिचा मुलगा आता या जगात नाही. कारण चिखलमय रस्त्याने तिच्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतला. गंगापुर तालुक्यातील लखमापुर रस्ता हा, याला रस्ता तरी कसं म्हणायचं ? एका आईच्या मुलाला या रस्त्यानं दूर केल्याच आपण पहिले आहे.
ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था अशी चिखलमय झाली आहे, आणि याच चिखल लहानग्या कृष्णाच्या जीवावरती उठला. पोट दुखणे, उलट्या होत असल्याने कृष्णा दवाखान्यात नेण्यासाठी वडिलांनी मोटरसायकल काढली, पण रस्त्यात चिखल होता, त्यांची मोटरसायकल रुतून बसली. मोठ्या कष्टानं तासभराच्या मेहनतीनंतर चिखल माती तुडवत कसाबसा दवाखाना गाठला. पण खूप उशीर झाला होता. वाटेतच कृष्णाचा दुर्दैवी अंत झाला होता. गावातून बाहेर यायचं झालं तर लखमापूर वाला एकच रस्ता असतो अगदी शेतात जायचं असलं तरी त्या वाटेने जावं लागतं. पण ही वाट थेट मृत्यूच्या दारातच नेऊन पोहोचवते या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांचा संताप वाढला आहे. वारंवार तक्रारी करून सुस्तावलेली यंत्रणा हा रस्ता दुरुस्त करत नाहीये. वर्षानुवर्षे रखडलेल्या कामामुळे अनेकांना त्रास होतो. तर आज एका मुलाचा जीव देखील गेला. मविआ सरकारच्या काळात रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने हे काम रखडल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.
हे वृत्त झी २४ तास ने दाखवल्यानंतर हा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिल, मात्र प्रश्न हा आहे की मुरदाड सरकारी यंत्रणा एकाचा बळी जाण्यापूर्वी जागी का होत नाही ? राज्याच्या काही कानाकोपऱ्यात घडलं की व्हिडिओ कॉल करून मुख्यमंत्री मदतीचा हात देतात. वेळप्रसंगी ते सरकारी यंत्रणेला धारेवर धरतात मात्र तेच मुख्यमंत्री संभाजीनगर रस्त्याकडे लक्ष का देत नाहीत ? त्या आईच्या चिमुकल्या कृष्णाचा बळी घेणाऱ्याचे कान मुख्यमंत्रीसाहेब उपटणार का ? असा सवाल इथले ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.