कामाच्या गोष्टी
नाशिक : अचानक गाडीला आग लागते आणि पुढे जे घडले त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
अचानक गाडीला आग लागलीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता ,सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली.
नाशिक-पुणे रोडवरील उपनगर सिग्नलवर काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास शेशी हरी हेमनानी यांच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली….
हेमनानी यांच्या कारमधून गरम वाफ येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ कार रस्त्याच्याकडेला घेऊन पाहिले. बोनेटमधून आगीच्या ज्वाला निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तात्काळ गाडीतील पाच जणांना बाहेर काढून सुखरूप ठिकाणी हलविले. त्यानंतर अचानक गाडीने पेट घेतला. यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती .
पाच ही जण सुखरूप राहिल्याने सुटकेचा नि :श्वास सोडला .