खुशखबर : पेट्रोल व डिजेलचे भाव कमी होणार ? नवनियुक्त मुख्यमंत्री यांची घोषणा.
नवनियुक्त मुख्यमंत्री यांनी विधानसभेत विशेष अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केलीय. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकार बहुमत चाचणी मध्ये यशस्वी झालं. आणि या सरकारला बहुमत पडलं त्यानंतर हे सरकार आता इथून पुढे टिकणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली यामध्ये माजी उपमुख्यमंत्री असतील. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेप्रति असणाऱ्या एकनिष्ठतेबद्दल वक्तव्य केलं. यामध्ये ते भाऊक देखील झाले पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की, कशा पद्धतीने ते कारभार करणार आहेत कशा पद्धतीने ते या राज्याचे सेवा करणार आहेत.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बराच गोष्टींवरती नजर टाकली. ते बऱ्याच गोष्टींबद्दल बोलले त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सध्या मी मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्षा चालकाचे हे सरकार आहे असं म्हणून हिणवलं. मात्र व्यावसाय करणं हे चुकीचं नाहीये सुरुवातीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील चायवाला म्हणून हिणवलं जात होतं. त्यांच्या व्यवसायावरनं त्यांना डवचला जात होत. मात्र व्यवसाय करणं चुकीचं नाही असं त्यांनी म्हटले हे सरकार प्रत्येकाचा आहे हे सरकार सर्वसामान्य जनतेचा आहे हे सरकार तुमचं आमचं सर्वांचं आहे असं म्हणत त्यांनी सर्वसामान्यांना जसा निर्णय हवा आहे अशी घोषणा केली आहे. जेणेकरून सर्व सामान्यांना ही घोषणा दिलासादायक आहे सर्वसामान्यांना येत्या काळामध्ये याचा फायदा होणार आहे
सध्या इंधनाचे दर हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरती नजर टाकली या इंधनावरती त्यांनी बातचीत केली आहे. ते म्हणतात की तेलाच्या किमती वाढल्यावर देखील महाराष्ट्राने व्हॅट कमी केला नव्हता. तेव्हा त्यांनी कमी करू अशी घोषणा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्यास मदत होईल असा आशावाद आपल्याला व्यक्त करायला हरकत नाहीये. आत्ताचे सरकार येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारी इंधनाचे दर कमी करेल अशी आशा आता निर्माण झाली आहे.