आत्ताच हाती आलेली बातमी ! तळीरामांनसाठी अतिशय वाईट बातमी.

बातमी तळीरामांना साठी वाईट बातमी असून महाराष्ट्रात दारूची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय सरकारकडून मागे घेण्यात येतोय. कोरोना ची परिस्थिती निवळली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच गृहविभागाने उत्पादन शुल्क विभागाला देखील पत्र लिहून याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
गृह विभागाच्या पत्रात काय ?
- गृह विभागाचे म्हणणे आहे की दारूची होम डिलिव्हरी करणे हे लॉक डाऊन ची परिस्थिती पाहून सोशल डिस्टंसिंग सुनिश्चित करण्यासाठी होम डिलिव्हरी ही प्रणाली चालू करण्यात आली होती.
- पण आता लॉक डाऊन नसल्याकारणाने महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ कमी झाल्यामुळे दारूची होम डिलिव्हरी बंद करण्यात आली आहे.
- सदरची होम डिलिव्हरी ही फक्त परवानाधारक दुकानासाठी होती.
होम डिलिव्हरी चालू करण्याबाबत बोलताना असेही म्हणतात की ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले होते पण आता कोरोनाचे केसेस कमी झाल्या कारणामुळे महाराष्ट्र सरकारने होम डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असून काळजी काळजी घेण्याची देखील गरज आहे, जास्त गर्दी मध्ये मास्क वापरणे गरजेचे असून राज्य सरकारचे सर्व परिस्थितींवर लक्ष आहे.