” हुंडा नको मामा, फक्त मुलगी द्या मला.” अस म्हणताच पाहा या मामाने अस काय केले कि, भाच्याने उचलले टोकाचे पाऊल.
आपण हुंडा नको फक्त मुलगी त्या मामा मला हे ऐकलं असेलच. अशीच एक घटना नांदेड या ठिकाणी घडली आहे. हा भाचा त्याच्या मामाकडे पोरगी मागतो पण या मामाने पहा काय केलं.
सदरील घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आहे. एकनाथ बंडू जाधव याने आपल्या मामाच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली. पण त्याच्या मामाने ” तू काही काम करत नाहीये, त्यामुळे मी तुला माझी मुलगी देऊ शकत नाही.” असं सांगून भाच्याला मुलगी देण्यासाठी स्पष्ट नकार दिला. आणि त्यामुळे या मामाच्या मुलीशी लग्न करण्याचे या एकनाथ चे स्वप्न धुळीस मिळाले.
यानंतर या एकनाथ ने आपल्या या मामाचा काटा काढायचा असं मनाशी ठरवून, शुक्रवारी रात्री घराबाहेर झोपलेले बालाजी यांच्याकडील कुऱ्हाडीने वार करून निर्घुण खून करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण गावांमध्ये खळबळ माजली आहे. सदरील प्रकरणी हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असताना खबऱ्यानमार्फत पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली. या माहिती मार्फत एकनाथ ला अटक केलं.
अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान एकनाथला पोलिसी खाक्या दाखवतात सदरील खून प्रकरणाचा उलगडा होऊ लागला. चाभरा येथील बालाजी काकडे यांच्याकडे या एकनाथने त्यांच्या मुलीचा हात मागितला होता यावेळेस या मामाने ” तू काही काम करत नसल्यामुळे मी तुला माझी मुलगी देऊ शकत नाही.” असं म्हणत एकनाथला मुलगी देण्यासाठी नकार दिला होता. आणि याचाच राग मनात धरून या भाच्याने त्याच्या मामाला संपवलं आहे. पोलिसांनी याबद्दलची अधिक चौकशी केली असता, या एकनाथचे वय 19 असल्याचं समोर आलं. याला सध्या अटक केला असून मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लग्नासाठी बरेच जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच असतात. यामध्ये बऱ्याच वेळेस आपण पाहतो की, जर आपल्या मामाकडे मुलगी असेल तर त्या मुलीचा हात बऱ्याच वेळेस मागितला जातो. पण प्रत्येक मामा याच मामाप्रमाणे आपल्या मुलीच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घेत असतो. जर या कोणत्याही मामाचा भाचा हा त्याची मुलगी सांभाळण्यासाठी, तिची जबाबदारी घेण्यासाठी योग्य असेल, तर कोणताही मामा लग्नासाठी नकार देत नाही. पण जर तुम्ही काहीच काम करत नसाल तर या मध्ये मामाने तुम्हाला नकार देण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे जर आपल्याला आपल्या मामाच्या मुलीचा हात मागायचा असेल तर आपण काहीतरी कामधंदा करणं गरजेचं असतं. जर तुमच्याकडे काम, धंदा, नोकरी असेल तर तुमचा मामा मुलगी देण्यासाठी कधीच नाही म्हणणार नाही.